शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
3
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
4
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
5
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
6
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
7
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
8
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
9
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
10
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
11
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
12
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
13
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
14
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

कोपरी उद्याची पाचपाखाडी होणार का? रातोरात बॅनर लागले, कोपरीकरांचे अस्तित्व धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 23:37 IST

नव्या प्रभाग रचनेमुळे येथील विद्यमान नगरसेवकांना देखील तिकीट मिळविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे  : प्रभाग रचना झाली आणि अनेक प्रश्न त्या निमित्ताने उपस्थित होऊ लागले आहेत. कोपरीमध्ये तर तेथील स्थानिकांचे अस्तित्व धोक्यात येण्याची भिती निर्माण झाली आहे. आधी नौपाडय़ाच्या स्वार्थासाठी कोपरी समिती नौपाडय़ात विलीन केली. त्यानंतर आता नव्या प्रभाग रचनेत येथील प्रभागच थेट वागळेला जोडले गेले आहेत. त्यामुळे सध्या येथील सोशल मिडियावर सध्या एक पत्र प्रपंच वायरल झाला असून कोपरी उद्याची पाचापाखाडी होणार का? असा सवाल उपस्थित करीत कोपरीकरांचे अस्तितव्य धोक्यात अशी सुचनाही त्या माध्यमातून देण्यात आली आहे.

येथील काही दक्ष दोघा तिघा मित्रंनी मिळून हा पत्र प्रपंच केला असून त्यामध्ये अनेक महत्वाच्या मुद्यांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे. पूव्रेचा इतिहास उभा करीत काल खंडातील बदला नुसार मराठी, कोळी, आगरी, पारशी, सिंधी, बौद्ध , कोकणी, गुजराती, मारवाडी, व इतर सर्व समाज या सर्वांचा मिळून ऐक सुंदर आधूनीक छोटा भारत या परिसरात तयार झाला. ग्राम पंचायत ते नगर पालीका आणी पुढे महानगर पालीका असा ठाणो शहराचा झालेला विकास व त्यात ठाणो पूर्व कोपरी विभागाचे योगदान कदापी विसरता येणार नाही. महापलिकेत रूपांतर झाल्या नंतर ठाणो पूर्वला ख:या अर्थांने विकास काय असतो तो दिसू लागला ठाणो महापालीकेतील रचने प्रमाणो कोपरी प्रभाग समिती अस्तित्वात आली. कधी काळी ९, ८, ६ , नगरसेवक असलेली कोपरी प्रभाग समिती राजकीय फायद्यासाठी ४ नगरसेवकांवर मर्यादीत झाली. पुढे तर कहरच झाला ठाणो पूर्व कडील आनंद नगर , गांधी नगर हा भाग वागळे प्रभाग समितीकडे जोडन्यात आला. कोपरीचा भाग छोटा केल्याने नागरीकांना नाहक त्नास सहन करावा लागत आहे. याच कालखंडा मध्ये कोपरी प्रभाग समिती नष्ट करून नौपाडा प्रभाग समितीमध्ये वर्ग करण्यात आली व कोपरी चे पूर्ण अस्तित्वच संपवण्यात आले. याला जबाबदार कोण ? असा सवाल उपस्थित करीत राजकीय मंडळींकडे अंगली निर्देश करण्यात आला आहे.  

त्यामुळे अशा राजकीय पुढा:यांसाठी कोपरी कर कीती दीवस बांधले जाणार आहोत? असा सवाल उपस्थित करीत ठाणो जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे या मतदारसंघाचे प्रतिनिधी करतात या मतदाराचे संघाचे नाव कोपरी पाचापाखाडी म्हणजेच आजची कोपरी उद्याची पाचपाखाडी होणार का? असा खोचक सवाल या निमित्ताने राजकीय मंडळींना उपस्थित करण्यात आला आहे.      

 तरी आमच्या कोपरीच्या नागरीकांना प्रश्न आहे की आपण आपली ओळख अबाधीत ठेवायची की नाही आम्ही तर नक्कीच आवाज उठवणार तुम्ही पण या कोपरी साठी सूजाण नागरीक म्हणून आम्हाला साथ द्या, आपल्या कोपरीचे विभाजन होण्यापासून ठाळूया असे आवाहनही या माध्यमातून करण्यात आले आहे.  

नव्या प्रभाग रचनेमुळे येथील विद्यमान नगरसेवकांना देखील तिकीट मिळविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. सहा नगरसेवकांचे चार नगरसेवक करण्यात आल्याने त्यातही एक प्रभाग कोपरी ते थेट उथळसर्पयत तर एक प्रभाग वागळेला जोडण्यात गेल्याने तिकीट मिळविण्यावरुन येथे चांगलेच खलबते उडणार आहेत. भाजपला शह देण्यासाठी सत्ताधा:यांकडून ही व्युव्हरचना आखण्यात आली आहे. परंतु, त्यामुळे कोपरीकरांचे विभाजन करण्यात आले आहे.