शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
2
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
3
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
4
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
5
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
6
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
7
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
8
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
9
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
10
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
11
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
12
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
13
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
14
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
15
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
16
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
17
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
18
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
19
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
20
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा

पोलिसांसाठीच्या योजनांची आर्थिक तरतूद वाढवणार

By admin | Updated: January 14, 2016 00:38 IST

राज्य शासनाकडून पोलिसांना मिळणारा निधी अपुरा पडतो. त्यामुळे पोलिसांसाठीच्या विविध योजना राबविण्यासाठी आर्थिक तरतुदींमध्ये वाढ करण्याचा मानस ठाण्याचे मावळते सहपोलीस

ठाणे : राज्य शासनाकडून पोलिसांना मिळणारा निधी अपुरा पडतो. त्यामुळे पोलिसांसाठीच्या विविध योजना राबविण्यासाठी आर्थिक तरतुदींमध्ये वाढ करण्याचा मानस ठाण्याचे मावळते सहपोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी व्यक्त केला. अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून मुंबईत प्रशासन विभागाची जबाबदारी लक्ष्मीनारायण यांच्यावर सोपविण्यात आली आहे. पदभार सोडण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली. ‘पोलिसांची वाहने, शस्त्रे, निवासस्थाने तसेच इतर सर्व सामग्रीच्या खरेदीसाठी राज्य शासनाच्या अर्थसंकल्पातील तरतूद वाढविल्यास अनेक गोष्टी शक्य होणार आहेत, याशिवाय, राज्यभरातील पोलिसांना मुंबईत औषधोपचार घ्यायचे झाल्यास तांत्रिक अडचणी येत आहेत. त्या दूर करण्याचा प्रयत्न होईल, असे ते म्हणाले. पोलिसांच्या बदल्या तसेच बढत्या आणि त्यांच्या कारभारात पारदर्शकता आणि सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न केला जाईल,’ असे त्यांनी सांगितले.ठाण्यातील आपल्या कारकिर्दीबद्दल ते म्हणाले, ‘ठाणेकरांनी कोणत्याही चांगल्या निर्णयाला उत्स्फूर्तपणे साथ दिली. डान्स बार किंवा खासगी बसेसवरील कारवाईच्या वेळी हा अनुभव आला. तपासामध्ये अधिकाऱ्याला वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळावे, म्हणून वापरलेल्या ‘सतर्क’ या सॉफ्टवेअरचा फायदा झाला. आता हीच यंत्रणा राज्यभर राबविण्यासाठी महासंचालक पातळीवर विचार सुरू आहे. सोनसाखळी चोरी तसेच महिलांच्या संदर्भातील गुन्ह्णांवर बऱ्यापैकी अंकुश मिळविला. त्यासाठी वेगळी पेट्रोलिंग योजना राबविली. आंबिवलीच्या इराणी वस्तीवर कोम्बिंग आॅपरेशन आणि प्रबोधनही केले.’ कामाचा आढावा घेताना ते म्हणाले, ‘वर्तकनगर येथील पोलीस वसाहतीचा म्हाडाकडून पुनर्विकास केला जाणार आहे. कर्मचाऱ्यांसाठी अल्प दरात घरेही उपलब्ध व्हावीत, यासाठी प्रयत्न केला.’ (प्रतिनिधी)नियंत्रण कक्षात लखनौ पॅटर्नठाण्यातील नियंत्रण कक्षात लखनौच्या धर्तीवर मोबाइल डाटा ट्रान्समीटर बसविले आहेत. त्यामुळे रस्त्यावरचा राडा थेट नियंत्रण कक्षात दिसणार आहे. ५० लाखांच्या खर्चातून नियंत्रण कक्षात कमांड सेंटर सुरू होणार आहे. याशिवाय, ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या नियंत्रण कक्षाचाही कायापालट करून आधुनिक सुविधांसह सीसीटीव्हींनी जोडला आहे. आधुनिकीकरणावर जोर देत लोकाभिमुख पोलिसिंगवर भर दिला, याकडे त्यांनी लक्ष वेधले.