शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसी हद्दीतील हॉटेलच्या वेळा वाढणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 00:26 IST

आयुक्त कळवणार निर्णय : हॉटेलमालकांनी घेतली भेट, व्यावसायिकांनी मांडल्या समस्या

डोंबिवली : उल्हासनगरच्या धर्तीवर केडीएमसी हद्दीतील हॉटेल, बार, रेस्टॉरंट मध्यरात्रीपर्यंत उघडी ठेवण्याची परवानगी द्यावी, या मागणीसाठी कल्याण, डोंबिवली येथील हॉटेल ओनर्स असो.च्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली. त्यावर आयुक्त सकारात्मक असून, निर्णय कळवणार असल्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले.कल्याणमधील असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण शेट्टी व डोंबिवलीतील अजित शेट्टी यांनी हॉटेलचालकांच्या समस्या मांडल्या. सात महिन्यांपासून हॉटेल व्यवसायाला फटका बसला आहे. सध्या अवस्था बिकट असून अनेकांनी व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील अनेक हॉटेल, बार हे सकाळी एकच शिफ्टमध्ये सुरू आहेत. दुपारी ४ वाजता अनेक जण बंद करतात. यातून त्यांना काहीच लाभ होत नाही. केवळ नावाला व्यवसाय सुरू आहे. सोमवारपासून हॉटेल सुरू असले, तरीही फिजिकल डिस्टन्सिंग ठेवण्यासाठी बहुतांश हॉटेलात केवळ ३३ टक्के आसनव्यवस्था ठेवण्यात आली आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेने हॉटेल सुरू नसल्याचे ते म्हणाले.वीजबिल, करामुळे मोडले कंबरडेवीजबिल, कर आणि कामगारांचे पगार, यामुळे हॉटेल व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. अशा अनेक अडचणी या व्यावसायिकांसमोर असल्याचे शेट्टी यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले.दरम्यान, आयुक्तांनी सगळ्या समस्या ऐकून घेत वेळ वाढवून देण्यासंदर्भात काही बदल करता येतो का? याचा विचार करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याचे शेट्टी म्हणाले.