ठाणे : हुंड्यासाठी एका विवाहितेवर सासरच्या मंडळीनी अमानुष अत्याचार केल्याचे प्रकरण सोमवारी उघडकीस आले. पतीने केलेल्या मारहाणीमुळे या महिलेचा गर्भपात झाला असून, तिच्या कानाचा पडदाही फाटला आहे.मुंब्रा येथील रेतीबंदर भागात राहणाऱ्या प्रियाचा विवाह कोपरी येथील जयेंद्र पाटील याच्याशी झाला होता. कार आणि घरखर्चाकरिता माहेरहून पैसे आणण्यासाठी पती आणि सासू जयवंती पाटील तिचा तीन वर्षांपासून छळ करीत होते. या वादातून पतीने तिच्या पोटात लाथा मारल्या. त्यामुळे तिचा गर्भपात झाला असून उजव्या कानाचा पडदाही फाटला. आईवडिलांनी लग्नात दिलेले ३५ तोळे सोन्याचे दागिने आणि वॉशिंग मशीनसारखे संसारोपयोगी साहित्य सासरच्या मंडळीने ठेवून घेतले असल्याचा आरोप तिने तक्रारीमध्ये केला आहे. तिच्या तक्रारीवरून मुंब्रा पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.अलीकडेच हुंड्याच्या मागणीला कंटाळून टिटवाळ्यातील एका महिला डॉक्टरने आत्महत्या केली. (प्रतिनिधी)
पतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात
By admin | Updated: December 22, 2016 06:08 IST