शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

दोन मृत्यू दाखल्याने पत्नी वारसा हक्कापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 03:01 IST

मलंगगडाजवळ असलेल्या कुशिवली गावात राहणारे मंगल जानू चिडा लग्नानंतर काही वर्षांनी दहिवली ग्रामपंचायत हद्दीतील सावरोली येथील आपल्या सासुरवाडीला येऊन स्थायिक झाले.

बदलापूर :  एकाच व्यक्तीचा एकाच तालुक्यात दोन ग्रामपंचायतींमध्ये वेगवेगळ्या वेळी मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. दोन्ही ठिकाणी मृत्यूची नोंद झाल्यामुळे मृत व्यक्तीची पत्नी वारसा हक्कापासून वंचित राहिल्याची घटना समोर आली आहे. पतीच्या निधनाची दोन ठिकाणी नोंद झाल्याने अंबरनाथ तालुक्यातील ही आदिवासी महिला आपल्याला वारसा हक्क मिळावा, यासाठी सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहे. हक्क नोंदीपासून तब्बल एक तप वंचित राहिली आहे. 

मलंगगडाजवळ असलेल्या कुशिवली गावात राहणारे मंगल जानू चिडा लग्नानंतर काही वर्षांनी दहिवली ग्रामपंचायत हद्दीतील सावरोली येथील आपल्या सासुरवाडीला येऊन स्थायिक झाले. मंगल चिडा यांचे भाऊबंद मात्र कुशिवली गावात आहेत. त्यांची वडिलोपार्जित काही एकर जमीन कुशिवली गावात आहे. मंगल यांचे २७ मे २००८ रोजी निधन झाले. त्यांच्या मृत्यूूची नोंद अंबरनाथ तालुक्यातील दहिवली ग्रामपंचायतीत करण्यात आली आहे. पतीच्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीमधील वाटा कायद्याने पत्नी आणि मुलीला मिळणे अपेक्षित आहे. त्याप्रमाणे त्या संपत्तीमध्ये वाटा मिळण्यासाठी सातबारा उताऱ्यावर त्यांच्या नावांची नोंद होणे गरजेचे आहे.

मंगीबाई मंगल चिडा असे पत्नीचे नाव आहे. तहसील कार्यालयात त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांचे पती मंगल यांचे २७ मे २००८ रोजी निधन झाले असून त्यांच्या मृत्यूूची नोंद अंबरनाथ तालुक्यातील दहिवली ग्रामपंचायतीत झाली आहे. प्रतिज्ञापत्रासोबत त्यांनी तो दाखलाही जोडला आहे. मात्र, संबंधित तलाठ्यांनी या प्रकरणी चौकशी केली असता याच तालुक्यातील श्री मलंगपट्ट्यातील कुशिवली ग्रामपंचायत हद्दीत याच व्यक्तीच्या नावे आणखी एक मृत्यू दाखला असल्याचे आढळले. त्या दाखल्यावरील मृत्यूची तारीख मात्र ३ एप्रिल २००८ अशी आहे. मंगल यांच्या मृत्यूच्या दोन ठिकाणी वेगवेगळ्या नोंदी आढळल्याने पत्नी मंगीबाई आणि मुलगी मीना बांगारे यांची वारसा हक्क नोंद रखडली आहे. एकुलत्या एक मुलीचे लग्न झाले आहे. माझा वारसा हक्क नोंद होऊन मला माझा हिस्सा मिळाला पाहिजे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली .

‘त्या’ व्यक्तीचा मृत्यू झाला हे निश्चित असल्याने त्यांचा वारस तपासून वारसदार महिला आणि त्यांच्या मुलीचे नाव वारस नोंद करण्यात कोणतीही अडचण दिसत नाही. संबंधित विभागाला त्यासंदर्भात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. - जयराज देशमुख, तहसीलदार   

टॅग्स :thaneठाणे