शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

दहिसर येथील विधवा महिलेचे घर तोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 23:13 IST

दहिसर पूर्व येथील मराठा कॉलनी येथील ज्योती फैदी या गरीब विधवा महिलेचे घर पालिकेच्या आर उत्तर विभागाने तोडले.

मनोहर कुंभेजकर मुंबई--दहिसर पूर्व येथील मराठा कॉलनी येथील ज्योती फैदी या गरीब विधवा महिलेचे घर पालिकेच्या आर उत्तर विभागाने तोडले.शिवसेनेने आर उत्तर सहाय्यक पालिका आयुक्त संध्या नांदेडकर यांना आज त्यांच्या दहिसर पश्चिम येथील आर उत्तर पालिका विभाग कार्यालयात चक्क 5 तास घेराव घातला.त्यावर लेखी माफी मागून नजरचुकीने ही तोडक कारवाई करण्यात आली असून परत सदर बांधकाम  बांधून देण्याचे लेखी आश्वासन देण्याची नामुष्की या सहाय्यक पालिका आयुक्तांवर आली. विशेष म्हणजे पतीच्या निधनानंतर 11 व्या दिवशी आणि घरात तीन विधवा असतांना त्यांनी ही माणुसकीला काळिमा फासणारी निर्दयी कारवाई केली ,तर या जागेलगत 100 वर्षे जुने घर असलेल्या वैशाली पवार या कुटुंबाची संरक्षक भिंत तोडली अशी माहिती आर मध्य व आर उत्तर प्रभाग समिती अध्यक्ष शीतल म्हात्रे यांनी केला आहे.यावेळी विभाग क्रमांक 1चे विभागप्रमुख विलास पोतनीस,मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे,महिला विभागसंघटक रश्मी भोसले स्थानिक नगरसेवक हर्षद कारकर,नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद,नगरसेविका सुजाता पाटेकर,नगरसेविका माधुरी भोईर आणि शिवसैनिक उपस्थित होते. दहिसर (पूर्व) प्रभाग क्रमांक 6 चे शिवसेना नगरसेवक हर्षद कारकर यांच्या वॉर्ड मधील मराठा कॉलनीमधील गेली  ६० वर्षे असलेल्या मराठी माणसांच्या अधिकृत बांधकामावर आर उत्तरच्या सहाय्यक पालिका आयुक्त  संध्या नांदेडकर यांनी 26 डिसेंबर रोजी ही निष्कलनाची कारवाई केली. एका महिलेच्या पतीच्या निधनानंतर 11 व्या दिवशी तीच्याकडे पुरावे असतांना नादेडकर यांनी पोलिस फाटा घेऊन ही निर्दयी आणि माणुसकीला काळिमा घालणारी कारवाई केली,अशी संतप्त प्रतिक्रिया शीतल म्हात्रे यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केले. या मनमानी सहाय्यक पालिका आयुक्त विरोधात शिवसैनिकांनी आज जोरदार निदर्शने केल्यानंतर नांदेडकर यांनी चूकीच्या कारवाईबद्दल नागरिकांची माफी मागितली व बांधकाम महापालिकेच्यावतीने पुन्हा बांधून देण्याची तयारी दर्शविली अशी माहिती त्यांनी दिली.या मुजोर सहाय्यक पालिका अधिकाऱ्यां विरोधात कारवाई करण्याची मागणी आपण मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याकडे केली असून सभागृहात आवाज उठवणार असल्याची माहिती शीतल म्हात्रे यांनी दिली.