शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना-मनसेत रस्ता रूंदीकरण, निधीवरून वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 00:41 IST

- सदानंद नाईक उल्हासनगर : कॅम्प नं-चार येथील जिजामाता गार्डन ते स्टेशन रस्त्याचे रूंदीकरण व साडेसात कोटीच्या निधीवरून शिवसेना ...

- सदानंद नाईक

उल्हासनगर : कॅम्प नं-चार येथील जिजामाता गार्डन ते स्टेशन रस्त्याचे रूंदीकरण व साडेसात कोटीच्या निधीवरून शिवसेना व मनसे आमने-सामने उभे ठाकले आहेत. शिवसेना नगरसेवक सुनील सुर्वे व मनसेचे जिल्हाउपाध्यक्ष सचिन कदम यांच्यातील वाद सोशल मीडियावर गाजत आहे.

उल्हासनगर पालिका बांधकाम विभागाने जिजामाता गार्डन ते स्टेशन रस्ता शहर विकास आराखडयात ६० फुटी असताना ४० फुटाचे रूंदीकरण व कामाचा प्रस्ताव बनविला. तसेच एक ते दीड किलोमीटर लांब काँक्रिटच्या रस्त्याचे डांबरीकरण, पदपथ व नाला बांधण्यासाठी तब्बल पाच कोटीच्या निधीला मान्यता दिली. रस्त्या शेजारी वीज वाहिनी भूमिगत करण्यासाठी सव्वादोन कोटीचा वाढीव निधी मंजूर केला. मनसेचे उपजिल्हाध्यांनी साडेसात कोटीचा निधी व सिमेंटच्या रस्त्यावर डांबरीकरण कशाला हा प्रश्न उपस्थित करून जिजामाता गार्डन शेजारी उपोषण सुरू केले. याप्रकाराने पालिका बांधकाम विभागाचे वाभाडे निघाले आहेत.

महापालिका आयुक्तांनी शहर विकास आराखडयानुसार रस्त्याचे रूंदीकरण होणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच काँक्रिटच्या रस्त्याऐवजी रस्ताच्या बाजूचे डांबरीकरण, नाले व पदपथ बांधणार असल्याचे सांगून रस्त्याच्या बाजूची वीज वाहिनी भूमिगत करण्यास हिरवा कंदील दिला. मात्र एक ते दीड किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी साडेसात कोटीचा खर्च येणार का? आदींवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. तसेच रस्ता रूंदीकरणात शेकडो जण बाधित होणार असून मालकी हक्क असणाऱ्यांना टीडीआर देण्याचे संकेत आयुक्तांनी मनसेच्या शिष्टमंडळाला दिले. रस्ता रूंदीकरणात नागरिकांची घरे बाधित होऊ नये म्हणून शिवसेना नगरसेवकांनी ६० ऐवजी ४० फुटाचा रस्ता बांधणीसाठी अशासकीय ठराव महासभेत मांडून मंजूर केला.

येत्या काही दिवसात शिवसेना आणि मनसेमध्ये रस्त्याच्या मुद्द्यावरून वाद निर्माण होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही मनसेकडून केला जात असल्याने त्याला शिवसेना उत्तर देईल असेही राजकीय निरीक्षकांना वाटत आहे.निधी नेमका कुणाच्या खिशात?मनसेच्या उपोषणामुळे रस्त्याचे रूंदीकरण ४० ऐवजी ६० फूट होऊन अनेकांची घरे व दुकाने बाधित होणार आहेत, असा आरोप स्थानिक नगरसेवक सुनील सुर्वे यांनी केला आहे. तर एक ते दीड किलोमीटर लांबीच्या रस्ता रूंदीकरणात, रस्त्याच्या बाजूचे डांबरीकरण, नाला व पदपथासाठी पाच कोटीच्या निधीचा खर्च कसा? असा प्रश्न मनसेचे सचिन कदम यांनी करून, निधी कुणाच्या खिशात, असा खोचक प्रश्नही त्यांनी विचारला आहे. अशासकीय ठराव हा पालिका प्रशासनाला बंधनकारक नसल्याचे आयुक्त अच्युत हांगे यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला दिले आहे. वाढीव निधीला मंजुरी दिली जाणार असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर