शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

हे सरकार निवडणुका लावण्याची हिंमत का दाखवत नाही?, ठाकरेंचा ठाण्यातून सवाल

By अजित मांडके | Updated: January 14, 2023 14:52 IST

ठाणे महापालिकेचे माजी नगरसेवक नरेश मणेरा यांच्यावतीने ठाण्यात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

ठाणे : मुंबई, ठाण्यासह राज्यातील  १८ महापालिकांच्या निवडणूका प्रलंबित असताना या निवडणुकांवरून युवा सेनाप्रमुख आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे. हे सरकार निवडणुका लावण्याची हिंमत दाखवत  दाखवत नसल्याचा टोला ठाकरे यांनी शिंदे सरकारला लगावला आहे. शिवसेनेत हा गट तो गट असे काहीच नसून जे गेले ते गद्दार गेले आणि इथे सर्व निष्ठावानच राहिले आहेत. त्यामुळे हे सरकार अल्पावधीत  कोसळणारच असा पुनरुच्चार पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांनी केला आहे.         ठाणे महापालिकेचे माजी नगरसेवक नरेश मणेरा यांच्यावतीने ठाण्यात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्याचे उदघाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी खा. राजन विचारे यांच्यासह खा. अरविंद सावंत तसेच  शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.या रोजगार मेळाव्याला संबंधित त्यांनी राज्यातील सरकार  टीका केली आहे . ठाण्यात एकीकडे निष्ठावान शिवसैनिकांकडून ठाण्यात रोजगार मेळावे आयोजित करण्यात येतात  तर दुसरीकडे ठाण्याच्याच एका गद्दारीने महाराष्ट्रातील उद्द्योग गुजरातला नेले असल्याचे टीका त्यांनी केली आहे. राज्यात काही नवीन चर्चा होत नाही केवळ एकाच कॅसेट वाजवली जात असून यामध्ये कार्यक्रम कोणताही असो त्यात आम्ही सहा महिन्यांपूर्वी काय केले ही एकच टेप वाजवली जात असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.   शिवसेनेचा जन्म हा रोजगार आणि स्थानिकांना न्याय देण्यासाठी झाला आहे. मात्र हे सरकार उद्योग बाहेर पाठवण्याचे काम करत आहे. ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला त्यावेळी हेच लोक टेबलावर नाचले होते या मानसिकतेचाही ठाकरे यांनी निषेध केला. शिवसेनेची भुमीका स्पष्ट असून हाताला काम देण्याची. रोजगाराची संधी असल्यास मराठी मुलांनी जगात कुठेही जाण्याची तयारी ठेवली पाहिजे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

निवडणुका घ्यायची हिंमत का दाखवत नाही?          शिंदे सरकारवर टीका करताना ठाकरे यांनी हे सरकार मोगलांचे सरकार असून या सरकारच्या मंत्रिमंडळात एकाही महिलेचा समावेश नाही. या सरकारमध्ये  शेतकऱ्यांचे आवाज दाबला जात असून राज्यात एवढे प्रश्न असताना तरुणांमध्ये  जाती आणि धर्माच्या नावावर भांडणे लावण्यात येत आहेत. दुसरीकडे राज्यातील महापालिकांच्या निवडणूक प्रलंबित असताना हे सरकार निवडणूका लावण्याची हिंमत का दखवत नाही, असा प्रश्न देखील ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेthaneठाणेEknath Shindeएकनाथ शिंदेElectionनिवडणूक