शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

वानखेडेंच्या विरोधातील कारवाई का बारगळली?

By admin | Updated: April 26, 2017 00:18 IST

केडीएमसीचे ‘क’ प्रभाग क्षेत्र अधिकारी अरुण वानखेडे यांच्याविरोधात कारवाई करून त्याबाबतचा अहवाल एप्रिलच्या महासभेत मांडण्यात येईल

कल्याण : केडीएमसीचे ‘क’ प्रभाग क्षेत्र अधिकारी अरुण वानखेडे यांच्याविरोधात कारवाई करून त्याबाबतचा अहवाल एप्रिलच्या महासभेत मांडण्यात येईल, असे आश्वासन महापौर राजेंद्र देवळेकर यांनी मार्चमध्ये झालेल्या महासभेत दिले होते. मात्र, एप्रिलच्या नुकत्याच झालेल्या महासभेत हा अहवालच सादर न केल्याने त्यांना महापालिका प्रशासन व महापौर पाठीशी घालत आहेत, असा आरोप शिवसेनेचे नगरसेवक मोहन उगले यांनी केला आहे. याप्रकरणी उगले यांनी महासभेत सभात्याग करून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.मार्चच्या महासभेत शिवसेना नगरसेवक श्रेयस समेळ यांनी सभा तहकुबीची सूचना मांडली होती. वानखेडे हे बेकायदा बांधकामांविरोधात कारवाई करीत नाहीत. बेकायदा बांधकामांविरोधात नगरसेवकांनी तक्रार केली, तर तक्रारदारांना तक्रार करणाऱ्या नगरसेवकाचे नाव सांगतात. बेकायदा बांधकामप्रकरणी समर्थन करणाऱ्या व हस्तक्षेप करणाऱ्या नगरसेवकांचे नगरसेवकपद रद्द केले जाते. मात्र, केडीएमसीत बेकायदा बांधकामांविरोधात आवाज उठवणाऱ्या नगरसेवकांना महापालिकेचे प्रभाग अधिकारी साथ न देता बेकायदा बांधकामधारकांच्या पाठीशी उभे राहून त्याला अभय देतात. अशा प्रकारचे काम वानखेडे यांनी केले आहे, असा आरोप समेळ यांनी केला होता. त्यामुळे त्यांना निलंबित न करता थेट महापालिका सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी समेळ यांनी केली होती. त्यांच्या या मागणीचे जोरदार समर्थन उगले यांनी केले होते. महापौरांनी प्रशासनाला आदेश देत पुढील महिन्याच्या महासभेत कारवाईचा अहवाल सादर करण्याचे सांगितले होते. या महिन्यात झालेल्या महासभेत उगले यांनी वानखेडे यांच्याविरोधात कारवाई काय करणार, त्यांच्या अहवालाचे काय, असा सवाल उपस्थित केला असता महापौरांनी उगले यांना बोलू दिले नाही. त्यामुळे उगले यांनी सभात्याग केला. (प्रतिनिधी)