शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
3
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
4
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
5
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
6
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
7
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
9
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
10
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
11
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
12
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
13
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
14
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
16
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
17
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
18
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
19
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
20
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी

सहलीला यंदाही विलंब का?; सभापती, सदस्यांनी विचारला जाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 00:26 IST

मार्चमध्ये नेणार सहल, प्रशासनाची माहिती

कल्याण : केडीएमसीच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची सहल वेळेवर निघावी, यासाठी या संदर्भातील प्रस्तावाला शिक्षण समितीने तत्काळ मान्यताही दिली. परंतु, जानेवारी उलटून आता मार्चनजीक येऊन ठेपला तरी सहल निघालेली नाही. याबाबत मंगळवारच्या शिक्षण समितीच्या सभेत सभापती व सदस्यांनी जाब विचारला. त्यावर प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, मार्चच्या पहिल्या आठवड्यात सहल निघेल, अशी माहिती शिक्षण विभागाचे अधिकारी जे. जे. तडवी यांनी दिली.केडीएमसीच्या शाळांमध्ये साधारण गरीब कुटुंबातील मुले शिक्षण घेतात. दरवेळेस सहलीच्या आयोजनाचा घोळ प्रशासनाकडून घातला जातो. परंतु, यंदा संबंधित प्रस्ताव मंजूर होऊनही सहल काढलेली नाही. याबाबत सदस्या छाया वाघमारे, उर्मिला गोसावी व सभापती नमिता पाटील यांनी दिरंगाईबाबत नाराजी व्यक्त केली. त्यावर लवकरच याची अंमलबजावणी केली जाईल, असे तडवी यांनी स्पष्ट केले. आता परीक्षानजीक येऊन ठेपल्या असताना मुले अभ्यास करणार की सहलीचा आनंद लुटणार, असाही सवाल यावेळी वाघमारे यांनी केला.त्याचबरोबर मंगळवारच्या सभेत शाळेतील वर्गखोल्या विशिष्ट कालावधीसाठी भाडेतत्वावर देण्याचे आठ प्रस्ताव मान्यतेसाठी प्रशासनाकडून ठेवण्यात आले होते. त्याला मान्यता देताना सहलीच्या मुद्यासह महापौर आदर्श शिक्षक पुरस्काराचा विषय उपस्थित करण्यात आला. यंदाच्या वर्षी संबंधित पुरस्कार का देण्यात आले नाहीत, याकडे वाघमारे यांनी लक्ष वेधले. त्यावर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने नियोजन करता आले नाही.यावर्षीचे आणि पुढील वर्षीचे पुरस्कार पुढच्या वर्षात दिले जातील, असे तडवी यांनी सांगितले. समिती दरवर्षी बदलते त्यामुळे पुरस्कारांचे आयोजनही दरवर्षी व्हावे, असे गोसावी म्हणाल्या.मुदत संपण्यापूर्वी प्रस्ताव आणामंगळवारच्या सभेत वर्गखोल्या भाडेतत्वावर देण्यासंदर्भातील प्रस्ताव दाखल केले गेले होते. परंतू त्यांचा मुदतीचा कालावधी उलटून गेला होता. त्यामुळे सचिव संजय जाधव यांनी असे प्रस्ताव मुदत संपण्यापूर्वी पाठविण्यात यावेत, अशी सूचना प्रशासनाला केली. सभापती पाटील यांनीही तसे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.शिक्षण समिती सदस्यांना सभेचे वावडेकल्याण : केडीएमसीच्या शिक्षण समितीची सभा मंगळवारी पार पडली. परंतु, सभेचे सदस्यांना वावडे असल्याची प्रचिती पुन्हा आली. ११ सदस्यांपैकी सभापतींसह केवळ पाचच सदस्य सभेला उपस्थित होते. यातील काहींनी उशिरा येण्याची परंपरा कायम ठेवल्याने गणसंख्या पूर्ततेच्या अभावी सभेला अर्धा तास उशिराने सुरुवात झाली.केडीएमसीच्या शाळांमधील वर्गखोल्या खाजगी संस्था, शाळांना भाडेतत्वावर देण्याचे प्रस्ताव शिक्षण समितीच्या सभेत मान्यतेसाठी प्रशासनाकडून दाखल करण्यात आले होते. दुपारी तीन वाजताची सभा होती. महापालिकेचे सचिव संजय जाधव, शिक्षण विभागाचे अधिकारी जे. जे. तडवी आणि सभापती नमिता पाटील हे सभेसाठी वेळेवर दाखल झाले होते.कालांतराने एकामागोमाग एक असे चार सदस्य सभागृहात आले. गणसंख्येची पूर्तता झाल्याने सभेला जाधव यांनी सुरुवात केली. तत्पूर्वी छाया वाघमारे यांनी सभेला दांडी मारणाºया व विलंबाने येणाºया सदस्यांच्या प्रवृत्तीवर नाराजी व्यक्त केली. जर सभेला यायला जमत नसेलतर समितीवर यायची आवश्यकता नव्हती. यात विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका