शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सोसायट्यांवर क्वारंटाइन केंद्राच्या खर्चाचा भार कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 00:27 IST

ठाणे जिल्हा सहकारी हाउसिंग फेडरेशन : ठाणे महापालिका आयुक्तांना दिले पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कोरोनावर मात करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून कोट्यवधींचा खर्च होत आहे. ठाण्यात गृहनिर्माण संस्थांनी क्लब हाउस, समाज मंदिर हॉल क्वारंटाइनसाठी उपलब्ध करून देण्याबरोबर त्याचा खर्च गृहनिर्माण सोसायट्यांनी करण्याचे आवाहन पालिका आयुक्तांनी केले आहे. रुग्णालय किंवा महापालिकेची जबाबदारी असताना हा खर्च सोसायट्यांनी का सोसावा, असा सवाल ठाणे जिल्हा सहकारी हौंसिग फेडरेशनचे अध्यक्ष सिताराम राणे यांनी पालिका आयुक्तांना पत्राद्वारे केला आहे.

अलिकडेच महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी ठाण्यातील गृहनिर्माण संस्थांना पत्र दिले होते. त्याद्वारे क्लब हाउस आणि विविधोपयोगी सभागृह हे क्वारंटाइन केअर सेंटर म्हणून घोषित केले. याबाबत राणे यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, अशा कामात शासनाला मदत करण्याला विरोध नाही. परंतु कोविड केअर सेंटर अर्थात सीसीसी म्हणून घोषित केल्यानंतर त्याच्या पूर्ततेसाठीच्या अटी गृहनिर्माण संस्थांसाठी जाचक आहेत. ज्या गृहनिर्माण संस्था स्वेच्छेने या अटी मान्य करतील त्यालाही विरोध नाही. मात्र आरोग्यविषयक प्रशिक्षित नसलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना आणि संस्थांना स्वखर्चाने ही यंत्रणा उभारण्यास सांगणे हे चुकीचे आहे. कोविड- १९ साठी शासनाच्या वतीने कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. मग हा भार गृहनिर्माण संस्थांवर टाकणे अयोग्य आहे. शिवाय, सहकार कायद्यालाही धरून नाही.

या परिपत्रकातील सातव्या अटीमध्ये प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची व्यवस्था कोण, कशी करणार, त्याची जबाबदारी कोणाची, याबद्दल काहीही माहिती दिलेली नाही.आठव्या अटीनुसार क्वॉरंटाईन सेंटरमधून निघणारा कचरा बायोमेडिकल वेस्ट सेंटरमध्ये देणे बंधनकारक आहे. बायोमेडिकल वेस्ट सोसायटीमध्ये तयार होत नसल्यामुळे त्याची व्यवस्था सोसायटी कशी करणार आहे? ही व्यवस्था करण्याची जबाबदारी महापालिका किंवा रुग्णालयांची आहे. नवव्या अटींनुसार सोसायटीतील डॉक्टर्सना रुग्णांची देखभाल करावी लागेल. सोसायटीमध्ये डॉक्टर उपलब्ध नसल्यास महानगरपालिकेकडून वैद्यकीय अधिकारी प्राप्त करून घेणे सोसायटीला बंधनकारक आहे. त्यासाठी लागणारे मानधन आणि इतर शुल्क रुग्णांनी, त्यांच्या नातेवाईकांनी किंवा सोसायटीने भरायचे आहे. त्यांनी हा खर्च न भरल्यास असा खर्च सोसायटी भरू शकणार नाही, कारण अशा कुठल्याही प्रकारचा खर्च करण्याची तरतूद गृहनिर्माण संस्थांच्या उपविधीत किंवा कायद्यातही नाही. त्यामुळे असा निधीही संस्थेकडे जमा नसल्यामुळे गृहनिर्माण संस्था असा खर्च करू शकणार नसल्याचे राणे यांनी म्हटले आहे.सभासदांना ‘ते’ प्रशिक्षण नाहीदहाव्या अटीनुसार जम्बो आॅक्सिजन सिलिंडर व आॅक्सिजन पुरवठा करणारा मास्क ठेवणे सोसायटीला बंधनकारक आहे. गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी किंवा सभासद हे आरोग्यविषयक प्रशिक्षण घेतलेले कर्मचारी नाहीत. त्यांच्या चुकीमुळे एखाद्या रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास सोसायटीच्या पदाधिकाºयांना जबाबदार धरले जाईल, त्यामुळे अशी आरोग्यविषयक कामे करण्याची जबाबदारी गृहनिर्माण संस्थांवर टाकू नये, अशी मागणी राणे यांनी केली आहे.