शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

सभेचे ठिकाण बदलण्याचे आदेश कोणासाठी?, गणेश नाईकांच्या भूमिकेमुळे तर्कवितर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 00:32 IST

राष्ट्रवादीची परिवर्तन संकल्प यात्रेची सभा पुर्वेकडील चक्कीनाका परिसरातील मैदानात १४ जानेवारी रोजी पार पडली.

कल्याण : राष्ट्रवादीची परिवर्तन संकल्प यात्रेची सभा पुर्वेकडील चक्कीनाका परिसरातील मैदानात १४ जानेवारी रोजी पार पडली. या सभेचे ठिकाण बदलण्याचे आदेश ठाणे जिल्हा प्रभारी गणेश नाईक यांनी ऐनवेळी दिल्याचे समोर आले आहे. दोन दिवस बाकी असताना सभेचे ठिकाण बदलण्याचे आदेश अचानक देण्यामागचे गौडबंगाल काय, असा सवाल आता उपस्थित झाला आहे. नाईक यांच्या आदेशानंतरही सभेचे ठिकाण बदलले गेले नसले तरी, हनुमंते यांच्या राजीनामापत्रात याचा उल्लेख झाल्याने तर्कवितर्क काढणे सुरु आहे.राष्ट्रवादीचे कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते यांनी त्यांचा राजीनामा सोमवारी पाठविला. पक्षाच्या सभेला पुरेशी गर्दी जमवू शकलो नसल्याने नैतिक जबाबदारी म्हणून आणि पक्षांतर्गत असहकार्याला कंटाळल्याचे कारण त्यांनी राजीनामा पत्रात नमूद केले आहे. राजीनामा पत्रात त्यांनी गणेश नाईक यांनी सभेचे ठिकाण बदलण्याचे आदेश दोन दिवस आधी दिले होते; परंतू ऐनवेळी मी ते आदेश पाळू शकलो नाही असेही म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, पुर्वेतील मैदानाची निवड का करण्यात आली, त्याचीही कारणे त्यांनी नमूद केल्याने हनुमंते यांना नाईकांचा आदेश रूचला नसावा, अशी शंका उपस्थित होते.>राष्ट्रवादीची सभा पार पडली, ते ठिकाण कल्याण पूर्व मतदारसंघात येते. येथील स्थानिक आमदार भाजपाचे गणपत गायकवाड हे पूर्वी राष्ट्रवादीचे सहयोगी अपक्ष आमदार होते. त्यांच्याशी असलेल्या संबंधांमुळे नाईकांनी सभेचे ठिकाण बदलण्याचा निर्णय घेतला तर नाही ना, अशी शंका उपस्थित होत आहे. दुसरीकडे मैदानाबाबत काही वाद असल्याने हे आदेश दिले असावेत, अशीही चर्चा आहे. नाईक यांच्याशी संपर्क साधला असता ते व्यस्त असल्याचे समजले.