शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

वांगणी परिसरातील बिबट्या गेला कुणीकडे?; सतर्क राहण्याचे केले आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 23:44 IST

संडे अँकर । नागरिकांमध्ये भीती : वनविभागाने केल्या विविध उपाययोजना 

बदलापूर : सुमारे पंधरवड्यापूर्वी वांगणीतील कडवपाडा परिसरात बिबट्या आढळून आल्याने खळबळ उडाली होती. मात्र, काही दिवसांपासून हा बिबट्या दिसत नसल्याने तो गेला तरी कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. बिबट्या आजूबाजूच्या गावांत शिरू नये, यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणीही नागरिकांकडून होत आहे.

बिबट्या दिसल्याची माहिती स्थानिकांनी वनविभागाला दिली होती. त्यानंतर पथकाने जाऊन पाहणी केली होती. त्याचप्रमाणे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले होते. मात्र, अद्याप या बिबट्याचा थांगपत्ता लागलेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर बिबट्याचा शोध घेण्यासाठी वनविभागाने ठिकठिकाणी ट्रेसिंग कॅमेरे बसविणे, पिंजरे बसविणे तसेच २४ तास रेंजरची गस्त ठेवून ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शिवसेनेचे मुरबाड विधानसभा संपर्कप्रमुख नरेंद्र शेलार यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर बदलापूरचे वनक्षेत्रपाल प्रमोद ठाकर यांच्याशी संपर्क साधला असता वनविभागाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या असल्याचे स्पष्ट केले. ज्या ठिकाणी बिबट्या आढळला होता, तो परिसर घनदाट जंगलाचा असून अनेकदा बिबट्या दिसल्याचे परिसरातील नागरिक सांगतात.

१५ दिवसांपूर्वी या परिसरात बिबट्या आढळून आल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितल्यानंतर नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी, याबाबत जनजागृती करण्यात आली आहे. या परिसरात हॅलोजन लाइट्स बसविण्यात आले असून वनविभागाचे पथक सातत्याने गस्त घालत आहे. त्याशिवाय, इतर आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, आतापर्यंत या परिसरात बिबट्या आढळला नसल्याची माहिती ठाकर यांनी दिली.बिबट्याने मार्ग बदलला?बिबट्याची वास घेण्याची क्षमता प्रचंड असते. त्यामुळे तो डोंगरावर असला, तरी डोंगर पायथ्याजवळ कोंबड्या, मेंढ्या आदी खाद्य असल्यास त्याला ते समजते. तो भक्षाच्या जवळ येतो. भक्ष मिळाल्यास तो दोन ते चार दिवस त्या भागात थांबतो. नाहीतर, तो आपला मार्ग बदलतो. गेल्या १५ दिवसांपासून या भागात बिबट्या आढळून आला नसल्याने त्याने आपला मार्ग बदलला असावा, असा आमचा अंदाज असल्याचेही प्रमोद ठाकर यांनी स्पष्ट केले.बिबट्याचा वावर वाढलावांगणीजवळ काही महिन्यांपूर्वी मृतावस्थेत बिबट्या सापडला होता. मात्र, त्याचा मृत्यू कशामुळे झाला, हे आजही स्पष्ट झालेले नाही. तसेच बदलापूरजवळील आंबेशीव गावात बिबट्याने एका वासराची शिकार केल्याचे उघड झाल्याने या परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे.