शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

स्पाच्या आड देहविक्री, व्यवस्थापक महिलेस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 00:01 IST

पेणकरपाड्यातील अजित पॅलेस हॉटेल गल्लीत डी-पॅरेडाईज या नावाने चालवण्यात येणाºया स्पा सेंटरच्या आड वेश्या व्यवसाय चालवला जात असल्याची माहिती

मीरा रोड : स्पाच्या आड चालणाऱ्या वेश्या व्यवसायप्रकरणी काशिमीरा पोलिसांनी व्यवस्थापक महिलेस अटक केली असून, स्पाच्या मालकाचा शोध सुरू आहे.

पेणकरपाड्यातील अजित पॅलेस हॉटेल गल्लीत डी-पॅरेडाईज या नावाने चालवण्यात येणाºया स्पा सेंटरच्या आड वेश्या व्यवसाय चालवला जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांना मिळाली. शिंगारे, उपनिरीक्षक चेतन पाटीलसह राजेश पानसरे, श्रीमंत जेधे, गुळदगडे, सुरडकर यांनी सापळा रचून बनावट गिºहाईक पाठवले.

स्पामधील व्यवस्थापक चित्रा संजय माने, रा. जनता बँकेच्या मागे, वसई हिने वेश्या व्यवसायासाठी या चार बनावट ग्राहकांसमोर तरुणी उभ्या केल्या. साडेतीन हजारात एका तरुणीचा सौदा ठरल्यानंतर त्या गिºहाइकाने पोलिसांना मिस कॉल देऊन सावध केले. त्यासरशी पोलिसांनी छापा टाकून चित्राला अटक केली. चार पीडित तरुणींची येथून सुटका केली. या स्पाचा मालक हनिफ शेख असून, पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

बारच्या आड अश्लील नृत्यकाशिमीरा पोलीस ठाण्यासमोरील नाक्यावर असलेल्या नाइट मीटिंग या बारमध्ये आॅर्केस्ट्राच्या आड अश्लील नृत्य चालत असल्याचा प्रकार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने टाकलेल्या छाप्यातून उघड झाला आहे. बारच्या सहा कर्मचाऱ्यांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. काशिमीरानाका येथील नाइट मीटिंग बारमध्ये अश्लील नाच चालत असल्याची माहिती मिळाल्यावर सहायक निरीक्षक देविदास हंडोरेसह आबा चौधरी यांनी बनावट गिºहाईक पाठवून आतील नृत्याचे गुप्त छायाचित्रण करून घेतले. त्यानंतर छापा टाकून बारच्या व्यवस्थापकासह सहा जणांना अटक केली.