शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

पूर्णेकरांचा उत्तराधिकारी कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 02:15 IST

ठाण्यातील काँग्रेसचे नेते बाळकृष्ण पूर्णेकर व संजय चौपाने यांचे रस्ते अपघातात आकस्मिक निधन झाल्याने ठाणे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

ठाणे : ठाण्यातील काँग्रेसचे नेते बाळकृष्ण पूर्णेकर व संजय चौपाने यांचे रस्ते अपघातात आकस्मिक निधन झाल्याने ठाणे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. ठाण्यातील शिवसेनेच्या बलाढ्य साम्राज्याशी लढा देण्याकरिता आता काँग्रेसकडे सक्षम नेतृत्व नसल्याची चर्चा सुरू झाली आहे.ठाण्यातील काँग्रेस संघटनेकडे सातत्याने दुर्लक्ष झाले होते. मात्र, पूर्णेकर यांनी तक्रारी करत न बसता काँग्रेसच्या जनाधाराच्या बळावर पक्षाच्या नगरसेवकांची संख्या वाढवण्याची धमक दाखवली होती. २०१२ च्या निवडणुकीत कॉंग्रेसचे तब्बल १७ नगरसेवक पालिकेवर निवडून आणले होते. विद्यार्थिदशेपासून ते राजकारणात सक्रिय होते. शिवसेनेत विद्यार्थी सेनेपासून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली असल्याने सत्ताधारी शिवसेनेची नेमकी नाडी त्यांना ठाऊक होती. ठाण्यात कायम विरोधी बाकांवर बसण्याची सवय झाल्याने म्हणा किंवा छगन भुजबळांसारख्या आक्रमक विरोधी पक्ष नेत्याने बाळकडू दिल्याने म्हणा, पूर्णेकर हे त्यांच्या आंदोलनाकरिता ओळखले जाणारे काँग्रेस नेते होते. त्यामुळे शिवसेनेतील मंडळीदेखील त्यांना वचकून असायची. त्यांच्यातील कामाची धमक व धडाडी पाहूनच पक्षाने त्यांच्यावर शहर जिल्हा अध्यक्षपदाची धुरा सोपवली आणि त्यांनी ती यशस्वीपणे पार पाडली.राजकारणात पूर्णेकरांसारखा कार्यकर्ता घडायला २५ ते ३० वर्षे लागतात. मात्र, पूर्णेकरांची जागा घेईल, असा दुसरा कार्यकर्ता सध्या तरी दिसत नाही.