शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

झेंडा कोणाचा? ६५ टक्के मतदान, काल्हेरमध्ये हाणामारी, मुसईचा बहिष्कार मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 02:59 IST

जवळपास साडेतीन वर्षांनी होत असलेल्या ठाणे जिल्हा परिषद आणि भिवंडी, शहापूर, मुरबाड, कल्याण, अंबरनाथ या पाच पंचायत समित्यांसाठी ६५ टक्के मतदान झाले.

ठाणे : जवळपास साडेतीन वर्षांनी होत असलेल्या ठाणे जिल्हा परिषद आणि भिवंडी, शहापूर, मुरबाड, कल्याण, अंबरनाथ या पाच पंचायत समित्यांसाठी ६५ टक्के मतदान झाले. भिवंडीतून सर्वाधिक सदस्य निवडून जाणार असल्याने तेथे भाजपाच्या खासदारांना झालेला विरोध, नंतर काल्हेरमध्ये शिवसेना-काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत झालेली मारामारी, पोलिसांना करावा लागलेला लाठीमार, ठिकठिकाणी होत असलेली बाचाबाची यामुळे ही निवडणूक गाजली. उरलेल्या भागात मतदान शांततेत आणि उत्साहात पार पडले.खोणीत काँग्रसेचा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे, तर दोन गणांत मतपत्रिका चुकीच्या पद्धतीने वाटल्याने फेरमतदान घ्यावे लागणार असल्याने शेलार आणि कोलीवली या गणातील मतमोजणी निवडणूक आयोगाने थांबवली आहे. त्यामुळे उरलेले ५२ गट व १०४ गणांचीच मोजणी गुरूवारी होणार आहे.आजवर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसचा वरचष्मा असलेल्या जिल्हा परिषदेची सत्ता काबीज करण्यासाठी भाजपानेही कंबर कसल्याने यावेळची निवडणूक अटीतटीची झाली. श्रमजीवी संघटनेला फोडून भाजपाने शिवसेनेला धक्का दिल्याने आदिवासी मतदार नेमके कोणाला मतदान करतात त्याकडे दोन्ही पक्षांचे लक्ष आहे. वेगवेगळ््या पक्षातील प्रबळ उमेदवार फोडण्याच्या भाजपाच्या खेळीला प्रत्त्युत्तर देण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने परस्परांना सहकार्य केले. काही ठिकाणी त्यात काँग्रेसही राष्ट्रवादीसोबत आली. या राजकीय समीकरणांतून नेमके काय साध्य होते, त्याला मतदार कसा प्रतिसाद देतात ते निकालातून स्पष्ट होईल.

टॅग्स :Electionनिवडणूक