शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

टार्गेट नेमके कोण; आयुक्त की अधिकारी?  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 05:51 IST

शहरातील विकासकामे हवी तशी मार्गी लागत नसल्याने एकीकडे आयुक्त आणि अधिकारी नगरसेवकांच्या टार्गेटवर असतानाच ‘नगरसेवक नाटक करतात,’ या वक्तव्यावारून महासभेत सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षाचे नगरासेवक त्यांना कोंडीत पकडणार असल्याने यावेळी महासभा गाजण्याची चिन्हे आहेत.

उल्हासनगर : शहरातील विकासकामे हवी तशी मार्गी लागत नसल्याने एकीकडे आयुक्त आणि अधिकारी नगरसेवकांच्या टार्गेटवर असतानाच ‘नगरसेवक नाटक करतात,’ या वक्तव्यावारून महासभेत सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षाचे नगरासेवक त्यांना कोंडीत पकडणार असल्याने यावेळी महासभा गाजण्याची चिन्हे आहेत. पालिका अधिकारी युवराज भदाणे यांच्या अभिनंदनाचा ठराव महासभेत भाजपाने दाखल केला आहे, तर त्यांच्याच निलंबनाचा प्रस्ताव सेनेने दिल्याने तोही चर्चेचा विषय आहे.शहरात पाणीटंचाई निर्माण झाल्याने नगरसेवक संतप्त आहेत. बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झाली असून आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्या बोटचेप्या धोरणामुळे विकासकामे ठप्प झाल्याचा सेनेचा आरोप आहे. त्यांच्या हकालपट्टीची मागणी मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांकडे शिवसेनेने केली आहे. एकूणच आयुक्त सतत वादात सापडत असून महासभेत आयुक्त विरूद्ध नगरसेवक असा सामना रंगण्याची शक्यता आहे.मनपा जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांनी मालमत्ता कर विभागात चांगले काम केल्याबाबत भाजपा नगरसेवक राजा वानखडे यांनी त्यांच्या अभिनंदनाचा ठराव आणला, तर सेनेचे शहरप्रमुख व नगरसेवक राजेंद्र चौधरी, रिपाइंचे गटनेते तसेच शहरजिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांनी भदाणेंच्या निलंबनाचा ठराव आणला. मालमत्ता करविभागाच्या प्रभारी कर निर्धारकपदी असताना त्यांनी एका मालमत्तेचे करनिर्धारण ७० लाख केले, तर उपायुक्त दादा पाटील यांनी त्याचेच करनिर्धारण १० लाख केल्यानेही वाद आहे. कर कमी झाल्याचे भदाणे यांनी आयुक्तांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी उपायुक्त दादा पाटील व नगरसेवक भगवान भालेराव यांना नोटिसा देऊन आठ दिवसात म्हणणे मांडण्याचे आदेश दिले होते. पण कराच्या प्रस्तावावर आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांचीच सही असल्याचे उघड झाले.महासभा गाजणार?आयुक्तांनी अचानक युवराज भदाणे यांची करनिर्धारण पदावरून उचलबांगडी केली. या मालमत्ता कर आकारणी प्रकरणी पुढे काय कारवाई झाली, असा प्रश्न सत्ताधारी आणि विरोधक सभागृहात उपस्थित करणार असून हे प्रकरण शांत का झाले, हा सवालही उपस्थित होतो आहे.