शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धार्मिक स्थळे तोडताना नवीन अनधिकृत स्थळांना अभय

By admin | Updated: April 20, 2017 04:00 IST

सर्वोच्च आणि उच्च न्यायालयासह राज्य शासनानेदेखील अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. मीरा-भार्इंदरमध्ये मात्र महापालिकेच्या

मीरारोड : सर्वोच्च आणि उच्च न्यायालयासह राज्य शासनानेदेखील अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. मीरा-भार्इंदरमध्ये मात्र महापालिकेच्या आशीर्वादाने सर्रास नवीन अनधिकृत धार्मिक स्थळे नव्याने उभी राहत आहेत. एकीकडे जुनी धार्मिक स्थळे अडथळा ठरतात, म्हणून पाडताना नव्याने होणाऱ्या बेकायदा धार्मिक स्थळांना अभय देण्याची महापालिकेची दुटप्पी भूमिका आहे.न्यायालय आणि शासनाच्या आदेशानंतर पालिकेने २९ सप्टेंबर २००९ पूर्वीची विकास आराखडा वा रस्ते यामुळे बाधित होणारी ७८ धार्मिक स्थळे अनधिकृत जाहीर केली होती. त्यातली १७ नियमित केली. २८ पाडण्यात आली असून ३३ धार्मिक स्थळे पाडायची आहेत. दरम्यान, एकीकडे महापालिका जुनी धार्मिक स्थळे तोडण्याची कारवाई करत असल्याचे न्यायालय तसेच शासनास दाखवत असले, तरी शहरात राजरोसपणे नव्याने अनधिकृत धार्मिकस्थळे उभी राहत आहेत. अगदी या अनधिकृत धार्मिक स्थळांचे उद्घाटन सोहळेदेखील जाहीरपणे प्रसिद्ध केले जात आहेत. परंतु, पोलिसांसह महापालिका आणि महसूल विभागही या नव्याने होणाऱ्या बेकायदा धार्मिक स्थळांबाबत मौन बाळगून आहे. आरएनपी पार्क, मुर्धा गावामागील मार्ग, दीपक रुग्णालय मार्ग, पूनम सागर अशा एक नव्हे तर अनेक ठिकाणी सर्रास अनधिकृत धार्मिक स्थळांची बांधकामे नव्याने झाली आहेत. मात्र उपायुक्त-आयुक्तांसह पालिकेचे प्रभाग अधिकारी या अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करत नसल्याने न्यायालय व राज्य शासनाच्या आदेशांना केराची टोपली दाखवली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. वास्तविक, स्थानिक नियोजन प्राधिकरण म्हणून हद्दीत होणारे कुठल्याही प्रकारचे बांधकाम पाडून टाकण्याचे व बांधकाम करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याची जबाबदारी मनपाची आहे. पालिकेने अनधिकृत बांधकामांवर कारवाईसाठी पालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांना पदनिर्देशित अधिकारी म्हणून ही जबाबदारी दिली आहे. परंतु, प्रभाग अधिकारी मात्र आपल्या जबाबदारीकडे सातत्याने सोयीस्कर डोळेझाक करून अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालत आहेत. अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर निलंबनासह अन्य कोणतीही कारवाई आयुक्त, उपायुक्त करताना दिसत नसल्यानेच अशी अनधिकृत बांधकामे फोफावली आहेत. (प्रतिनिधी)