शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही चालायचे कुठे?

By admin | Updated: February 9, 2017 03:56 IST

रेल्वे स्थानकावरील पादचारी पूल आणि त्याला लागून असलेला स्कायवॉकचा संपूर्ण ताबा हा फेरीवाल्यांनी मिळविला आहे. या फेरीवाल्यांनी पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागाही शिल्लक ठेवलेली नाही

पंकज पाटील,अंबरनाथअंबरनाथ रेल्वे स्थानकावरील पादचारी पूल आणि त्याला लागून असलेला स्कायवॉकचा संपूर्ण ताबा हा फेरीवाल्यांनी मिळविला आहे. या फेरीवाल्यांनी पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागाही शिल्लक ठेवलेली नाही. स्कायवॉकवरुन जाण्यासाठी पादचाऱ्यांना फेरीवाल्यांच्या विळख्यातून मार्ग काढत पुढे सरकावे लागत आहे. स्कायवॉकचा ताबा हा पालिकेकडे असतानाही प्रशासन या फेरीवाल्यांवर कारवाई करताना दिसत नाही. अंबरनाथ रेल्वे स्थानक परिसराला फेरीवाल्यांचा विळखा बसलेला असतानाच आता या फेरीवाल्यांनी पादचारी पुलाचाही ताबा घेतला आहे. रेल्वे स्थानक परिसर गचाळ केल्यावर या फेरीवाल्यांनी आता रेल्वे पुलावर आपला मोर्चा वळविला आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला फेरीवाले बसत असून काही फेरीवाले पुलाच्या मध्यभागी उभे राहून व्यवसाय करत आहेत. रेल्वे पुलासोबत काही फेरीवाल्यांनी पुलाला लागून असलेल्या स्कायवॉकचाही ताबा मिळविला आहे. स्थानकाला लागून असलेल्या झोपडपट्टीतील नागरिकांनी हा संपूर्ण परिसर व्यापला आहे. रेल्वे पुलावर बसून भाजी आणि फळ विक्री करताना त्यांची दादागिरी आणि गैरवर्तवणुकीचा फटका नागरिकांना बसत आहे. मागील १५ दिवसांपासून रेल्वे सुरक्षा दलाने या फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मोहीम थंड केल्यावर फेरीवाल्यांचा व्याप जास्तच वाढला आहे. मिळेल तिथे फळ आणि भाजी विक्री केली जात आहे. रेल्वे पुलाची जबाबदारी पालिका आणि रेल्वे प्रशासन दोघांवर आहे. मात्र पालिका प्रशासन कधीच या पुलावर कारवाई करीत नाही. एवढेच नव्हे तर हक्काच्या स्कायवॉकवरही पालिकेचे अतिक्रमण विरोधी पथकाचे कर्मचारी फेरीवाल्यांना हटविण्याचे काम करताना दिसत नाही. एखाद्या पादचाऱ्याचा पाय फेरीवाल्यांच्या टोपलीला किंवा ठेवलेल्या मालावर पडला तर हे फेरीवाले अंगावर धावून येतात. नुकसान झाले असे कारण पुढे करुन भरपाई मागण्यास सुरुवात करतात. पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागा शिल्लक राहत नसल्याने चुकून पाय लागण्याचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांना होणाऱ्या त्रासाची माहिती पालिका प्रशासनला आहे. मात्र कारवाईसाठी त्यांच्याकडे वेळ नाही. ज्या स्टेशन चौकात पोलीस चौकी दिली आहे त्याच चौकीला लागून सर्व फेरीवाले बसलेले असल्याने पोलीसही या फेरीवाल्यांपुढे हतबल झाले आहेत.