शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

आमच्या हक्काचे पाणी मुरतेय कुठे? हे शोधा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 03:29 IST

महिलांचा सवाल : डोंबिवलीमधील म्हात्रेनगरमध्ये पाणीप्रश्न बनला गंभीर

अनिकेत घमंडीडोंबिवली : लघुपाटबंधारे विभागाच्या आदेशानुसार केडीएमसीने सप्टेंबरपासून पाणीकपात लागू केली आहे. मात्र, २० वर्षे आमचे पाणी नेमके कुठे मुरतेय, याचा शोध घ्या. भरमसाट मालमत्ताकर, पाणीबिले घेता तरीही आमच्या तोंडचे पाणी पळवले आहे. त्याला जबाबदार कोण, असा सवाल म्हात्रेनगर प्रभागातील त्रस्त महिलांनी ‘लोकमत’कडे केला. महापालिका अधिकाऱ्यांनी आधी पाणी द्यावे, मग बुस्टरवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

म्हात्रेनगरमध्ये १९९९ पासून पाणीसमस्या भेडसावत आहे. या प्रभागातील मारुती, आकृती, जागृती, बिंगो प्रसाद, कचरू भवन, सद्गुरू सेवासदन, सुदामा, अमरीश, अरुण, ओमधारा, अवंतिका, गणेश कृपा, बसवेश्वर, अमोलदीप आदी सोसायट्यांतील रहिवासी पाणी मिळत नसल्याने हैराण झाले आहेत. पाण्याचा दाब अत्यंत कमी असतो. जमिनीपासून फुटावर नळ असतानाही बादली भरत नाही. काही इमारतींत जेमतेम अर्धा तास पाणी येते. त्यातही तिसºया-चौथ्या मजल्यावर पाणीच येत नाही. त्यामुळे अनेकदा टँकर मागवावा लागतो. एका टँकरसाठी दोन हजार रुपये लागतात. महागाईमुळे टँकर मागवणेही परवडत नाही. टँकरमुळे कुटुंबाचे आर्थिक नियोजन कोलमडत आहे. लोकप्रतिनिधी, महापालिकेचे अधिकारी येतात-जातात, पण हा प्रश्न काही सुटत नाही. मग कर का भरायचे, असा प्रश्न रसिका जोशी, मेघा पाटील, मेघा चोरगे, सुमंगला नायर, वैशाली भोसले, मीनल टीकम, मानसी चोरगे, रश्मी खेंगरे आदी महिलांनी विचारला.पाण्याअभावी नातेवाइकांना घरी बोलावता येत नाही. तर घरांत कलहही वाढले आहेत. शेजाºयांशीही खटके उडतात. पाणी वापरताना काटकसर करावी लागत आहे. अनेकदा कागदी प्लेट, ग्लासचा वापर करावा लागत आहे, अशी व्यथा महिलांनी मांडली. २०१२ पासून पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. २०१६ मधील दुष्काळाच्या वेळी आठवडाआठवडा पाणी मिळाले नव्हते. यंदाही तशी स्थिती उद्भवण्याची शक्यता असल्याचे महिला म्हणाल्या.आयरे येथील दोनपैकी एका जलकुंभातून थेट पाणीपुरवठा केला जात असल्याचा महापालिकेच्या अधिकाºयांचा दावा आहे. त्यासाठी एक एमएलडीची तरतूद आहे. पण, प्रत्यक्षात पाणी मिळत नाही. ते मुरतंय कुठे? पाणी चोरणाºयांचा शोध घेण्याची आमची मागणी आहे. मात्र, महापालिका तो घेत नाही, अशी टीका महिलांनी केली.म्हात्रेनगर प्रभागात १७ लाख रुपये खर्चून नवी पाण्याची लाइन टाकण्याची वर्कआॅर्डर मंजूर झाली आहे. पण, ती टाकून काही उपयोग नाही. त्यासाठी आधी तीन तास चांगल्या दाबाने पाणीपुरवठा होणे आवश्यक आहे.- मुकुंद पेडणेकर, नगरसेवकम्हात्रेनगरमध्ये काही ठिकाणी पाणीसमस्या आहे. ती लवकरच सुटण्याची चिन्हे आहेत. त्यासाठी काही तांत्रिक बदल, क्रॉस कनेक्शन करणे आवश्यक आहे. त्यावर अभ्यास सुरू आहे. कनिष्ठ अभियंत्यांना तशा सूचना दिल्या आहेत. एका जलकुंभातून तेथे सुरळीतपणे पाणीपुरवठा होत आहे.- राजीव पाठक, अभियंता,पाणीपुरवठा विभाग, केडीएमसी 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाthaneठाणे