शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कोपर खाडीतील कांदळवन कुठे?

By admin | Updated: March 17, 2017 06:03 IST

बेकायदा बांधकामे, बेसुमार रेतीउपसा यामुळे कोपर खाडीतील कांदळवन पूर्णपणे नष्ट झाले आहे. कोपर आणि आयरे परिसरातील कांदळवन गेले कुठे

डोंबिवली : बेकायदा बांधकामे, बेसुमार रेतीउपसा यामुळे कोपर खाडीतील कांदळवन पूर्णपणे नष्ट झाले आहे. कोपर आणि आयरे परिसरातील कांदळवन गेले कुठे, अशी विचारणा करणारी कायदेशीर नोटीस माहिती अधिकाराचे कार्यकर्ते कौस्तुभ गोखले आणि भाजपा नगरसेवक राजन सामंत यांनी संबंधित विभागांना बजावली आहे. कांदळवनाची कत्तल करणारे पुरावेच त्यांनी छायाचित्रांसह सादर केले आहेत. महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अ‍ॅथॉरिटी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, ठाणे जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्तांना त्यांनी ही नोटीस बजावली आहे. कोपर व आयरे परिसरांतील कांदळवन नष्ट झाले आहे. कोपर येथे १ लाख ३५ हजार ५३८ चौरस मीटर जागेवर कांदळवन होते. बेकायदेशीर रेतीउपसा व बेकायदा बांधकामांनी कांदळवनाचा बळी घेतला आहे. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास झाला आहे. खाडी व समुद्रकिनारी असलेली कांदळवने ही माशांची सूतिकागृहे समजली जातात. यामुळे खाडीतील जैवविविधता जोपासली जाते. खाडीला जाऊन मिसळणारे प्रदूषित पाणी, खाडीत सोडले जाणारे मलमूत्रमिश्रित पाणी, यामुळे खाडी प्रचंड प्रदूषित झाली आहे. बेकायदा रेतीउपशामुळे कांदळवनाची मुळे तग धरत नाहीत. तसेच बेकायदा बांधकामांसाठी कांदळवनाची कत्तल करून मातीचे भराव टाकून तेथे बेकायदा बांधकामे उभारण्यात येत आहेत.कल्याण-डोंबिवली महापालिकेचा आधारवाडी डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न सध्या राष्ट्रीय हरित लवादापुढे न्यायप्रविष्ट आहे. हे डम्पिंग बंद करून तेथे घनकचऱ्यावर प्रक्रिया करणारा शास्त्रोक्त प्रकल्प उभारण्यात दिरंगाई का झाली, याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी सादर करावा, असे लवादाकडून सूचित केले होते. त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी मुदतवाढ मागून घेतली.घनकचरा प्रकरणातही गोखले हेच याचिकाकर्ते आहेत. आधारवाडी डम्पिंग आहे. तेथील कांदळवन नष्ट झाल्याने कल्याण-डोंबिवली, कोपर, आयरे रोड येथे पूरसदृश परिस्थिती उद्भवू शकते. लवादापुढे हा मुद्दा उपस्थित करून संबंधित अधिकाऱ्यांनी कांदळवन जोपासण्यासाठी काय कार्यवाही केली, त्याची विचारणा करावी, अन्यथा नोटीस दिलेल्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करावेत, असे गोखले यांनी नमूद केले. कांदळवनप्रकरणी ‘दी बॉम्बे एन्व्हायर्नमेंट अ‍ॅक्शन ग्रुप’ व इतर यांनी उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवर ६ आॅक्टोबर २००५ ला सुनावणी झाली आहे. त्यानुसार, राज्य सरकारने एक अध्यादेश त्यावेळी काढला होता. नागपूरच्या रिमोट सेन्सरिंग अ‍ॅप्लिकेशन सेंटरद्वारे कांदळवनाच्यादूर संवेदन उपग्रह इमेज काढाव्यात. कांदळवनाच्या जागेवर बांधकामांना बंदी घालावी. कोणत्याही विकास प्राधिकरणास कांदळवन क्षेत्रात बांधकामाची परवानगी देऊ नये. सरकारी जमिनीवरील कांदळवनास संरक्षित वने व खाजगी जमिनीवरील कांदळवनास ‘वने’ असे घोषित करावे. कांदळवनात बेकायदा बांधकाम करणाऱ्या किती जणांविरोधात गुन्हे दाखल केले, गुन्हेगारांची संख्या किती, काय कार्यवाही केली, याचा अहवाल चार आठवड्यांत तयार करून तो सरकारला सादर करावा, असे सूचित केले होते. हा आदेश देऊन ११ वर्षे उलटून गेली. त्यावर, अद्याप काहीच कार्यवाही झालेली नाही. (प्रतिनिधी)