शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात १३ रुपयांत वडापाव अन् ३० रुपयांत उसळवडा कुठे मिळतो? ते स्टॉल दाखवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 09:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क  ठाणे : ठाण्यात वडापाव खायचा तर २० रुपये मोजावे लागत असताना जिल्हा निवडणूक विभागाने त्याकरिता १३ ...

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाण्यात वडापाव खायचा तर २० रुपये मोजावे लागत असताना जिल्हा निवडणूक विभागाने त्याकरिता १३ रुपयांचा दर निश्चित केला, पाण्याची बाटली २० रुपयांना मिळत असताना ती १२ रुपयांत कशी द्यायची आणि ७० ते ८० रुपयांना मिळणारा उसळवडा ३० रुपयांत कसा द्यायचा खर्चाचा ताळमेळ कसा बसवायचा असा पेच उमेदवारांपुढे उभा ठाकला आहे. निवडणूक विभागाने प्रचार खर्चाचे प्रारूप दर निश्चित केले. 

खाद्यपदार्थांचे दरवडापाव, वडा उसळ ते कटिंग चहा, कॉफी पर्यंतचे दर निश्चित करण्यात आले आहे. प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा घालून दिली आहे. पालिकेच्या निवडणुकीतील उमेदवारास १३ लाखांच्या खर्चाची मर्यादा आहे उमेदवार किती खर्च करतो हे पाहण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केली असून, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकांची नेमणूक केली आहे. .

राजकीय पक्षांपुढे पेचनिवडणूक विभागाने निवडणुकीसाठी टाचणीपासून जेवणापर्यंतचे निश्चित केलेले दर आणि बाजारातील दर यामध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे खर्च करायचा कसा हा पेच राजकीय पक्षांपुढे उभे ठाकला आहे.

कटिंग चहा सहा रुपयांत कसा पाजायचा? कटिंग चहा दहा रुपयांचा असताना त्यासाठी सहा रुपये दर आहे. समोसा एक नग १५, पावभाजी ९० रुपयांपासून पुढे असताना त्यासाठी ७० रुपये, साबुदाणा वडा ८० रुपये असतांना त्यासाठी ४०, साबुदाणा खिचडी ३५,  आम्लेट सँडविच ३६, व्हेज सँडविच प्लेन ३०, चीज ग्रिल्ड सँडविच १००, पोहे २५, शिरा २५, उपमा २४ रुपये असे दर निश्चित केले आहेत. 

भिवंडीत उमेदवारांना खर्चाची ९ लाखांची मर्यादाभिवंडी : निवडणुकीसाठी उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा ९ लाखांपर्यंत केली आहे. प्रचारासाठी रॅलीसह, सभा, बॅनर, नाष्ट्यापासून ते स्टेशनरीपर्यंत सुमारे ५०२ साहित्यांची यादी प्रसिद्ध केली. निवडणूक विभागाने दिलेल्या खर्चांत वडापाव खर्च १३ रुपये, वडा उसळ ३० रुपये, समोसा १५ रुपये, इडली सांबार ३०, मेदू वडा, चटणी ४० रुपये, नारळ पाणी ४० रुपयांपर्यंत सूचना आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Thane Elections: Affordable Food Rates Challenge Candidates, Cost Discrepancies Noted.

Web Summary : Thane's election commission set food rates, sparking candidate concerns. Vada pav at ₹13, usal vada at ₹30 challenge budget management due to market price differences. Expenditure limits and monitoring teams add to the pressure.
टॅग्स :Thane Municipal Corporation Electionठाणे महापालिका निवडणूक २०२६