शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

पार्किंगचे धोरण फाइलीतून रस्त्यावर उतरणार तरी कधी? दीड वर्षापूर्वीच ठराव मंजूर

By अजित मांडके | Updated: January 9, 2024 09:27 IST

ठराव अद्याप प्रशासनाकडे आलेला नाही

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: गेल्या दहा वर्षांपासून ठाणे महापालिकेचे पार्किंग धोरण कागदावर आहे. दीड वर्षापूर्वी महासभेत मंजूर झालेला ठराव अद्याप प्रशासनाकडे आलेला नाही. ठाणे महापालिकेने कापूरबावडी, माजिवडा येथील पुलाखाली आणि वागळे इस्टेट येथील रस्त्यावर पार्किंग सुरू करण्यासाठी निविदा काढल्या आहेत, परंतु पुलाखालील पार्किंगला एका वकिलाने विरोध करून पालिकेला नोटिसा धाडल्या आहेत. त्यामुळे धोरण निश्चित नसल्याने, शहरात कुठेही कशाही पद्धतीने वाहने उभी केली जातात.

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या ठाणे महापालिका प्रशासनाने उत्पन्नाचे नवे स्रोत शोधण्यास सुरुवात केली आहे. गेल्या १४ वर्षांपासून कागदावर असलेले रस्त्यावरील स्मार्ट पार्किंग धोरण गुंडाळत त्याऐवजी परंपरागत पद्धतीने रस्त्यावर सशुल्क पार्किंग धोरण राबविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. यासंबंधीचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला होता. त्यानुसार, शहरातील १६८ रस्त्यांवर ११ हजार ९३१ वाहने उभी करण्याची सुविधा उपलब्ध होणार असून, त्यामध्ये ६,४७७ दुचाकी, १,५४६ तीनचाकी, ३,३६० हलकी चारचाकी, ५४८ अवजड चारचाकी वाहनांचा समावेश आहे. या पार्किंगसाठी अ, ब, क, ड अशी रस्त्यांची वर्गवारी करून, त्याप्रमाणे वाहन पार्किंग शुल्काचे दर निश्चित केले आहेत.

या प्रस्तावामुळे ठाणेकरांना वाहन पार्किंगची सुविधा उपलब्ध होण्याबरोबरच महापालिकेला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळणार असल्याचे पालिका प्रशासनाने म्हटले होते. हा प्रस्ताव दीड वर्षापूर्वी मंजूर करण्यात आला होता.

वकिलाची नोटीस

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून आता कापूरबावडी आणि माजिवडा उड्डाणपुलाखाली वाहने पार्क करण्यासाठी निविदा काढली आहे, तसेच वागळे इस्टेट भागातील रोड नं. २२ येथेही पार्किंगसाठी निविदा काढली. वागळे इस्टेटला काही अडचण नसली, तरी माजिवडा आणि कापूरबावडी उड्डाणपुलाखाली होणाऱ्या पार्किंगच्या विरोधात एका वकिलाने महापालिकेच्या संबंधित विभागाला नोटीस धाडल्याची माहिती पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

प्रशासकीय कारभार सुरू असताना इतर कामांसोबत पार्किंग धोरणाचे काम होणे अपेक्षित होते. मात्र, यात पालिका अधिकारी स्वत:ची कातडी वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यांची उदासीनता दिसत आहे. पार्किंग प्लाझा उभारायचा ठराव असता, तर तो लगेच मंजूर झाला असता.-नरेश म्हस्के, माजी महापौर, ठामपा.पार्किंगबाबत काही नवीन पर्याय शोधण्याचा विचार सुरू आहे. कापूरबावडी, माजिवडा, वागळे इस्टेट येथील पार्किंग संबंधी निविदा काढण्यात आल्या आहेत, परंतु पुलाखालील पार्किंगला विरोध होत असेल, तर त्याला विधि विभागामार्फत योग्य ते उत्तर दिले जाईल, शिवाय सार्वजनिक रस्त्यांवर पार्किंग व्यवस्था मजबूत करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत.- अभिजित बांगर, आयुक्त, ठामपा.

टॅग्स :thaneठाणेParkingपार्किंग