शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्तांना आर्थिक मदत मिळणार तरी कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 00:20 IST

भाजप गटनेत्याचा सवाल : साडेतीन कोटींचा निधी दोन दिवसांत तहसील कार्यालयास मिळणार

कल्याण : पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र, अनेकांनी मदतीचे अर्ज करूनही त्यांना मदत मिळालेली नाही. त्यामुळे या पूरग्रस्तांना सरकारी मदत मिळणार कधी, असा सवाल केडीएमसीतील भाजप गटनेते विकास म्हात्रे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांना निवेदन दिले आहे.

कल्याण-डोंबिवलीसह कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागाला पुराचा फटका बसला होता. २६ जुलै, ४ आॅगस्टला झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या घरात तीन ते चार दिवस पाणी होते. सरकारने सुरुवातीला ज्यांच्या घरात किमान दोन दिवस पुराचे पाणी होते, तसेच ज्यांची घरे अधिकृत आहेत, अशा पूरग्रस्तांना किमान पाच हजारांची मदत दिली जाईल, असे परिपत्रक काढले होते. मात्र, पूरग्रस्तांनी सरकारच्या या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. लोकप्रतिनिधींनीही सरसकट मदत देण्याची मागणी केली. त्यानंतर ही अट शिथिल केली गेली.कल्याणच्या तहसीलदारांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे १६ कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यानुसार, हा निधी कल्याण तहसील कार्यालयास मिळाला. पूरग्रस्तांच्या थेट खात्यात भरपाईची रक्कम जमा केली गेली. मात्र, ज्यांना ही मदत मिळाली नाही, त्यांच्यासाठी विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी तहसील कार्यालयाने आणखी १० कोटींची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली होती. परंतु, ही रक्कम अद्याप जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आलेली नसल्याने अनेकांना मदत मिळालेली नाही, याकडे म्हात्रे यांनी लक्ष वेधले आहे. त्यामुळे अगोदर आलेली मदत किती जणांना दिली गेली आहे, अजून किती जणांना वाटप होणे बाकी आहे, असा सर्व तपशील त्यांनी तहसील कार्यालयाकडून मागितला आहे.याप्रकरणी आकडे यांना विचारले असता ते म्हणाले की, १६ कोटी रुपयांची मदत पूरग्रस्तांना देण्यात आली आहे. भरपाई न मिळालेल्यांसाठी १० कोटी रुपयांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मागितला आहे. त्यापैकी साडेतीन कोटी रुपयांची रक्कम दोन दिवसांत तहसील कार्यालयास मिळणार आहे. त्यानंतर निधीचे वाटप केले जाईल.कल्याण पूर्वेतील नागरिकही मदतीपासून वंचितच्कल्याण : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत सरकारकडून पंचनामे झाले, अर्जही भरून घेण्यात आले पण अद्याप कल्याण पूर्वेतील काहींना धनादेशाचे वाटप झालेले नाही. ती मदत तत्काळ मिळावी, यासंदर्भात माजी नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश तरे यांनीही कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांना निवेदन दिले आहे.च्जुलै, आॅगस्टमधील अतिवृष्टीचा कल्याण पूर्व भागालाही मोठा फटका बसला होता. यात नागरिकांच्या घरातील सामानांसह शेतकऱ्यांचे भातशेतीचे मोठे नुकसान झाले होते. सरकारतर्फे पूरग्रस्तांसाठी १५ हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती. यानिमित्ताने नुकसान झालेल्या भागांचे पंचनामे केले. नागरिक व शेतकºयांकडून अर्जही भरून घेण्यात आले. परंतु, खडेगोळवली, काटेमानिवली, शिवाजीनगर आणि वालधुनी भागातील काहींना अद्यापही १५ हजार रुपयांची मदत मिळालेली नसल्याचे तरे यांनी तहसीलदारांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

टॅग्स :thaneठाणेfloodपूर