शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

अंतर्गत निवडणुकांना मुहूर्त कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 03:23 IST

केडीएमसी : आचारसंहिता समितीच्या निर्णयाची प्रतीक्षा

कल्याण : केडीएमसीच्या परिवहन समितीचे सभापतीपद, शिक्षण समिती सदस्य, सभापती आणि प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुका घेण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने आचारसंहिता छाननी समितीचे मत मागवले आहे. परंतु, अद्याप समितीने कोणताही निर्णय दिलेला नसल्याने या निवडणुका होणार तरी कधी, असा सवाल केला जात आहे.

केडीएमसीच्या परिवहन समितीमधील सहा रिक्त झालेल्या जागांवर नव्या सदस्यांची निवड प्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे सभापतीपदाची निवडणूक केव्हा होणार? याबाबत सदस्यांना उत्सुकता लागली आहे. सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची नियुक्ती कोकण विभागीय आयुक्तांनी केली आहे. मात्र, अद्याप निवडणुकीची तारीख मिळालेली नाही. त्यात लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत, अशा निवडणुका घेता येतात का? याबाबत संभ्रम निर्माण झाल्याने मुख्य सचिवांच्या आचारसंहिता छाननी समितीकडून जिल्हाधिकारी कार्यालयाने मार्गदर्शन मागवले आहे.परिवहन समितीपाठोपाठ शिक्षण समिती सदस्य व सभापती, १० प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकाही आहेत. परंतु, परिवहन सभापती निवडणूक घेण्याबाबत अद्यापपर्यंत निर्णय न झाल्याने अन्य निवडणुकाही रखडणार आहेत. दुसरीकडे अंबरनाथ, उल्हासनगर महापालिकांमधील अंतर्गत निवडणुकाही यामुळे खोळंबल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता व्यक्त होत असताना दुसरीकडे मुंबई महापालिकेतील स्थायी, शिक्षण, बेस्ट समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने परवानगी दिल्याने त्या निवडणुका घेण्यातही आल्या. परंतु, कल्याण महापालिकेसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अंतर्गत निवडणुकांबाबत आयोगाकडून कोणताही निर्णय अद्यापपर्यंत दिला गेलेला नसल्याने प्रतीक्षा कायम राहिली आहे.निवडणुकीत सर्व व्यस्तसध्या लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यात अधिकारी व सर्वच राजकीयपक्षांचे पदाधिकारीही व्यस्त झाले आहेत. त्यामुळे २९ एप्रिलला मतदान झाल्यानंतरच अंतर्गत निवडणुका होतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाthaneठाणे