शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

रखडलेल्या विकासकामांना मुहूर्त कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 00:25 IST

डोंबिवलीतील स्थिती; रस्ते, गटारे, मलवाहिन्यांची कामे अर्धवट स्थितीत

डोंबिवली : सध्या लॉकडाउनमध्ये बंद असलेल्या रेल्वे सेवेचा फायदा उठवित कल्याण-डोंबिवली शहरातील रखडलेली रेल्वे उड्डाणपुलांची कामे रेल्वे आणि केडीएमसीने सुरू केली आहेत. परंतु, कोरोनामुळे बहुतांश ठिकाणी मलवाहिनी, रस्ते काँक्रिटीकरण, गटार आणि छोट्या नाल्यांच्या बांधणीची ठप्प झालेली कामे मात्र सुरू झालेली नाहीत. येऊ घातलेला पावसाळा पाहता ही महत्त्वाची कामे तातडीने होणे गरजेचे आहे, अन्यथा परिस्थिती अधिकच बिकट होण्याची शक्यता आहे.मागील पावसाळ्यात खड्ड्यांनी बेजार केले होते. परंतु, पुढे हिवाळा व आता उन्हाळ्यातही खोदकामांची परंपरा सुरूच होती. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून अमृत योजनेंतर्गत मलवाहिनी टाकण्याची कामे सुरू होती. तर काही ठिकाणी काँक्रिटीकरणाची कामे चालू होती. मात्र, संथगतीने सुरू असलेल्या या कामांना कोरोनाचा फटका बसला आहे. सध्या ही कामे पूर्णपणे बंद आहेत. हे चित्र घरडा सर्कल ते खंबाळपाडा चौक, कल्याण-डोंबिवली रेल्वे समांतर रस्ता आणि ९० फुटी रोडवर पहायला मिळते. ही कामे अर्धवट स्थितीत बंद पडल्याने आजही काही रस्ते वाहतुकीसाठी बंद आहेत. त्यामुळे वाहने विरुद्ध दिशेने चालविली जात आहेत.सध्या मलवाहिनीच्या कामांबरोबर काँक्रिटीकरणाची कामेही बंद आहेत. अर्धवट राहिलेली ही कामे पूर्ण होणे महत्त्वाचे आहे. एमआयडीसीकडून निवासी भागात नवीन जलवाहिन्या टाकण्याची आणि गटार, छोटे नाले बांधण्याची कामे सुरू होती. दोन ते अडीच फूट व्यासाच्या जलवाहिन्या टाकण्याचे काम निवासी भागातील सर्व्हीस रोडवर सुरू होते. परंतु, ते कामही आता पूर्णपणे बंद आहे. दरम्यान, लॉकडाउनमध्ये रेल्वे आणि केडीएमसीने कोपर आणि पत्रीपुलाचे काम सुरू केले आहे.तर एमएमआरडीए आणि एमएसआरडीसीनेही कल्याण-शीळ मार्गावर विकासकामांना सुरुवात केली आहे. याप्रमाणेच केडीएमसी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून रखडलेल्या कामांना प्राधान्य दिले गेले पाहिजे अन्यथा अर्धवट राहिलेल्या कामांमुळे पावसाळ्यात खड्डेमय स्थिती राहण्याबरोबरच तसेच पाणी तुंबण्याची समस्या उद्भवण्याची चिन्हे आहेत.तातडीच्या कामांना प्राधान्य : महत्त्वाची आणि अत्यंत गरजेची असलेली उड्डाणपुलांची कामे सध्या हाती घेण्यात आली आहेत. तेथे काम करणाऱ्या कामगारांना नियमांचे पालन करायला सांगितले आहे. वेळोवेळी त्यांची वैद्यकीय तपासणीही होत आहे. बाकीच्या कामांचा ३ मेनंतर विचार केला जाणार आहे. फिजिकल डिस्टन्सिंगचे नियमही पाळणे गरजेचे आहे. - सपना कोळी-देवनपल्ली, शहर अभियंता केडीएमसी