शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
2
नाद खुळा! जसप्रीत बुमराहचा भन्नाट चेंडू, सुनील नरीन बेल्स उडताना पाहत बसला, Video
3
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
4
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
5
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
6
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
7
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
8
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
9
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

केडीएमसीच्या लोकप्रतिनिधींची पावले थिरकतात तेव्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2018 4:50 AM

अत्रे रंगमंदिराचा पुनर्लोकार्पण सोहळा : ‘तू गं दुर्गा तू भवानी’ या गीतावर नृत्य सादर, कर्मचाऱ्यांच्या सादरीकरणालाही दाद

कल्याण : केडीएमसीचा पस्तिसावा वर्धापन दिन रंगला तो महापालिका कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी यांनी सादर केलेल्या नृत्याविष्कारामुळे. नगरसेविकांनी अंबामातेच्या गीतावर केलेले नृत्य लक्षवेधी ठरले, तर महापालिकेतील कर्मचाºयांनी विविध सांस्कृतिक कार्यक्र म सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.

महापालिकेचा ३५ वा वर्धापन दिन आणि जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून आचार्य अत्रे रंगमंदिराचे पुनर्लोकार्पण महापौर विनीता राणे यांच्या हस्ते व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यानिमित्ताने महापालिका कर्मचाºयांचे सांस्कृतिक कार्यक्रम झाले. यावेळी गणेशवंदना, कथ्थक तसेच शेतकरी, आदिवासी, राजस्थानी, कोळी नृत्यांनी रसिकांची वाहवा मिळवली. या कर्मचाºयांच्या पाठोपाठ नगरसेविका आशालता बाबर, शालिनी वायले, हर्षाली थवील, सुनीता खंडागळे, शीतल मंडारी, भारती कुमरे यांनी ‘तू गं दुर्गा तू भवानी’ या गीतावर नृत्य सादर करत ‘हम भी कुछ कम नही’ हे दाखवून दिले. या त्यांच्या नृत्याला भरभरून दाद मिळाली. वाहनचालक प्रकाश वाघ यांनी केलेले सादरीकरणही लक्षवेधी ठरले. या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रेय लधवा आणि प्रसाद दाणी यांनी केले.माजी सचिवांचा विशेष सत्कार२००१ मध्ये अत्रे रंगमंदिराच्या शुभारंभप्रसंगी सादर झालेल्या ‘रायगडाला जेव्हा जाग’ या नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे कलावंत व केडीएमसीचे माजी सचिव चंद्रकांत माने आणि संभाजी महाराजांच्या भूमिकेतील कलावंत कार्यकारी अभियंता सुनील जोशी यांचा यावेळी शिंदे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.उत्तम सुविधांसाठी प्रयत्नशीलपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या स्मार्ट सिटीच्या योजनेत राहण्यायोग्य शहरांमध्ये देशातील पहिल्या १०० शहरांत कल्याण-डोंबिवलीचा पन्नासावा, तर महाराष्ट्रात दहावा क्र मांक आला, हे प्रशंसनीय आहे. कल्याण स्थानक परिसर स्वच्छ व सुंदर करून तेथील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी स्मार्ट सिटीअंतर्गत विविध प्रकल्प हाती घेतले आहेत, अशी माहिती देताना नागरिकांचे राहणीमान उंचावण्यासाठी त्यांना उत्तम नागरी सुविधा देण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही आयुक्त गोविंद बोडके यांनी दिली.देखभालीची कामे एनजीओंना द्यावीतशहरांचा विकास साधताना तेथील भौगोलिक व सांस्कृतिक बाजूंचा अभ्यास करून विकास साधावयास पाहिजे. कल्याण-डोंबिवली शहरांनी ऐतिहासिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक मिळवला महापालिका क्षेत्राचा विकास साधण्यासाठी आवश्यक तेवढा निधी वेळीच उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन सभापती राहुल दामले यांनी दिले. अत्रे रंगमंदिर आणि अन्य वास्तूंची देखभाल करण्याची कामे एनजीओ यांना द्यावीत, असा मोलाचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.समन्वयातून विकासकामे कराच्नागरिकांना उत्तम प्रकारच्या नागरी सुविधा मिळण्यासाठी प्रशासन आणि शासन या दोन्ही घटकांनी समन्वय साधून एकत्रितरीत्या विकासकामे करावीत, असे आवाहन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले. विकासकामांना चालना देण्यासाठी पीपीपीच्या धर्तीवर उपाययोजना कराव्यात, अशी सूचना त्यांनी प्रशासनाला केली. ते पुढे म्हणाले की, रंगमंदिराचे नूतनीकरण केल्याने त्याला नवसंजीवनी मिळून नवी झळाळी मिळाली आहे.च्याबद्दल त्यांनी प्रशासन, कंत्राटदार, पत्रकार, नगरसेवक व पदाधिकाºयांना धन्यवाद दिले. माझा राजकीय प्रवास याच रंगमंदिरापासून झाला. माझे खासदारकीचे तिकीट याच ठिकाणी घोषित झाले, त्यावेळी मी माझे पहिले भाषण इथेच केले. आज माझ्याच हातून पुनर्लोकार्पण होत आहे, ही अभिमानाची आणि योगायोगाची बाब असल्याचे शिंदे म्हणाले.हा माझ्यासाठी भाग्याचा क्षणहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या आचार्य अत्रे रंगमंदिराचे पुनर्लोकार्पण माझ्या हातून होत असल्याने हा माझ्या दृष्टीने भाग्याचा क्षण आहे. मी स्वत:ला भाग्यवान समजते, अशा शब्दांत महापौर विनीता राणे यांनी भावना व्यक्त केल्या. सांस्कृतिक क्षेत्रात रंगभूमीला अनन्यसाधारण महत्त्व असून नाट्यकलाकार व नाट्यरसिकांना हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. याचबरोबर नागरिकांना उत्तम मूलभूत सुविधा देण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे अभिवचन त्यांनी याप्रसंगी दिले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाthaneठाणे