शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात एमएमआरडीएच्या ७ रस्त्याच्या कामाला मुहूर्त कधी? आयुक्तांनी घेतली बैठक

By सदानंद नाईक | Updated: July 28, 2023 17:45 IST

महापालिका स्थायी समिती सभागृहात त्यांनी एमएमआरडीए अधिकाऱ्या सोबत संयुक्त बैठक घेऊन चर्चा केली आहे.

उल्हासनगर : शहरातील मुख्य एकून ७ रस्त्यासाठी एमएमआरडीएने १५० कोटीचा निधी मंजूर केला. मात्र रस्त्याच्या कामाला मुहूर्त लागत नसल्याने, रस्ते मुदतीत पूर्ण करण्यासाठी आयुक्त अजीज शेख हे अकॅशन मूड मध्ये आले. महापालिका स्थायी समिती सभागृहात त्यांनी एमएमआरडीए अधिकाऱ्या सोबत संयुक्त बैठक घेऊन चर्चा केली आहे.

 उल्हासनगरातील नेताजी चौक मार्गे कुर्ला कॅम्प ते कैलास कॉलनी, न्यू इंग्लीश हायस्कुल ते लालचक्की चौक, शांतीनगर डॉल्फीन क्लब मार्गे सेंच्युरी ग्राउंड ते गुरुव्दारा, वाकी कंपाउंड रस्ता, सोनार चौक रस्ता, हिराघाट टेंपल ते डबी हॉटेल व्हाया समर्पन अपार्टमेंट रस्ता, हिराघाट येथील शामाप्रसाद मुखर्जी चौक ते शांतीनगर व्हाया विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन रस्ता असे एकून ७ रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्याला एमएमआरडीएने गेल्या सहा महिन्यांपूर्वी १५० कोटीच्या निधीला मंजुरी दिली. मात्र अद्यापही रस्त्याच्या कामाला मुहूर्त लागला नसून रस्ते मुदतीत होण्यासाठी आयुक्त अजीज शेख हे अकॅशन मूड मध्ये आले आहेत. त्यांनी गुरवारी महापालिका स्थायी समिती सभागृहात अधिकाऱ्यांची रस्त्या बाबत संयुक्त बैठक घेतली आहे.

 शहरातील या मुख्य ७ रस्त्यांची कामे महत्वाकांक्षी असून सदर रस्त्यांच्या कामांकरीता मंजूर झालेल्या निधीचे विहीत मुदतीत विनियोग होणे आवश्यक आहे. याकरीता महापालिका अधिकाऱ्यांनी वेळोवेळी एमएमआरडीए अधिकाऱ्या सोबत वेळावेळी समन्वय साधून विकास कामे लवकरात लवकर पूर्ण होणे बाबत पाठपुरावा केला. सध्या सणोत्सव जवळ येत आहे, तसेच शहरात चालिया हा उत्सव सुरु आहे. नागरिक व वाहतुकीच्या सोईकरीता रस्त्यांवरील खड्डे बुजवून रस्ते सुस्थितीत ठेवणेबाबत एमएमआरडीएचे अधीक्षक अभियंता अर्जुन कोरेगावर, महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. करुणा जुईकर, जमीर लेंगरेकर, शहर अभियंता संदिप जाधव, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे, एमएमआरडीएचे अमोल जाधव तसेच संबंधित सल्लागार व ठेकेदार यांच्यात बैठक झाली. यावेळी आयुक्त अजीज शेख यांनी मंजूर रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना बजावले आहे.मंजूर रस्त्याच्या दूरस्तीवर लाखोंचा खर्च एमएमआरडीएने शहरातील एकून ७ रस्त्यासाठी १५० कोटीच्या निधीला मजुरी दिली. मात्र वेळेत रस्त्याचे काम सुरू न झाल्याने, महापालिकेला रस्त्याची दुरुस्ती करण्याची वेळ आली आहे. यातूनच आयुक्तांनी बैठक घेऊन रस्त्याचे काम सुरू करण्याचे आदेश दिले आहे. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर