शहरं
Join us  
Trending Stories
1
‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू; पुण्याच्या दिशेने जात होता...
2
Pune Crime: संतापजनक!१९ वर्षीय तरुणीवर वारकरी संस्थेत आणून अत्याचार; कीर्तनकार महिलेचाही कटात सहभाग
3
Vishwas Kumar : बोलणं बंद, झोप उडाली, मेंटली डिस्टर्ब... प्लेन क्रॅशमधून वाचलेल्या विश्वासची 'अशी' झालीय अवस्था
4
रीलपायी जीव गमावला! १६ वर्षांचा मुलगा ट्रेनवर चढला, हाय पॉवर केबलला स्पर्श झाला अन्...
5
'पायलटच्या आत्महत्येचा आरोप निराधार...' विमान अपघाताच्या चौकशी पथकात समावेश करण्याची पायलट युनियनची मागणी
6
तुमच्या कुंडलीत आहे पंचमहापुरुष योग? धन-धान्य-वैभव, पैसा कमी पडत नाही; भरघोस भरभराट, शुभ-लाभ!
7
'विराटला १८ वर्षांनंतर जिंकताना पाहून...", आरसीबीच्या विजयावर जिनिलियाची प्रतिक्रिया
8
फक्त निमिषाच नाही, तर जगभरातील तुरुंगात 'इतक्या' भारतीयांना झाली मृत्युदंडाची शिक्षा
9
चीननं केला विश्वासघात, भारताला दिली 'या' देशाने साथ; ५ वर्षाचं टेन्शन मिटलं, शेतकऱ्यांना मोठा फायदा
10
Sneha Debnath : ६ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या स्नेहाचा मृतदेह सापडला; आई-वडिलांचा टाहो, मैत्रिणीचा मोठा दावा
11
Good Luck Cafe: बन मस्क्यामध्ये काचेचे तुकडे; एफ. सी. रोडवरील गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता निलंबित
12
Accident: आंब्याने भरलेली लॉरी मिनी ट्रकवर उलटली; ९ जण ठार, अनेकजण जखमी!
13
गृहप्रवेशानंतर नववधू चक्कर येऊन पडली, पतीने थेट प्रेग्नन्सी टेस्ट किटच आणली! चिडलेल्या नवरीने काय केलं वाचाच... 
14
Pravin Gaikwad : 'माझ्या हत्येचा कट होता, याला पूर्णपणे सरकार जबाबदार'; प्रवीण गायकवाडांचा आरोप
15
स्मशानभूमीचे उद्घाटन न झाल्याने अंत्यविधीस परवानगी नाकारली; भरपावसात डिझेल ओतून पेटवली चिता
16
नवी मुंबई: बेलापूरमधील पारसिक टेकडीवर भूस्खलन; मातीच्या ढिगाऱ्यासह झाडे उन्मळून पडली
17
Anthem Biosciences IPO आजपासून गुंतवणुकीसाठी खुला; कधीपर्यंत आणि किती करावी लागेल गुंतवणूक, GMP किती?
18
मनसेचे २ दिवसीय शिबिर, ठाकरे बंधू युतीवर भूमिका ठरणार; राज ठाकरे काय देणार 'कानमंत्र'?
19
'ते गप्पा चांगल्या मारतात, पण रात्रीच्या अंधारात लोकांवर बॉम्ब टाकतात', ट्रम्प पुतीन यांच्यावर भडकले
20
अरे देवा! आई वारंवार भेंडीची भाजी बनवायची म्हणून लेक चिडला, १२०० किमी दूर पळून गेला अन्...

ठाण्याच्या मेट्रोचा नारळ केव्हा फुटणार!

By admin | Updated: June 8, 2015 03:54 IST

मुंबईतील मेट्रो रुळांवर आल्यानंतरही ठाण्यातील मेट्रो रेल्वे अडथळ्यांच्या शर्यतीत अडकली होती. मात्र, त्यातूनही मार्ग काढून वडाळा-घोडबंदर (कासारवडवली) मेट्रोला अखेर गेल्या वर्षी मंजुरी मिळाली.

अजित मांडके/ पंकज रोडेकर, ठाणे मुंबईतील मेट्रो रुळांवर आल्यानंतरही ठाण्यातील मेट्रो रेल्वे अडथळ्यांच्या शर्यतीत अडकली होती. मात्र, त्यातूनही मार्ग काढून वडाळा-घोडबंदर (कासारवडवली) मेट्रोला अखेर गेल्या वर्षी मंजुरी मिळाली. मात्र, ठाणे मेट्रोच्या भूमिपूजनाला अद्यापही मुहूर्त लागत नसल्याचे दिसत आहे. दुसरीकडे इतर शहरांमध्ये मेट्रोच्या प्रकल्पाला वेग येत असताना ठाण्यावरच अन्याय का, असा सवालही उपस्थित होत आहे.कासारवडवली येथे मेट्रोच्या कारशेडसाठी सुरू केलेल्या सर्वेक्षणाला शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला होता. याच दरम्यान, या प्रकल्पामुळे जमिनींच्या किमतींमध्ये वाढच होणार असल्याने शेतकऱ्यांना दुप्पट फायदा तसेच भूमिपुत्रांना रोजगारही मिळणार आहे. या कारशेडसाठीही शेतकऱ्यांची समजूत काढण्यात पालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना यश आले आहे. त्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात येणार असल्याने या शेतकऱ्यांनी कारशेडसाठी आपल्या जमिनी देण्यास हिरवा कंदील दर्शविल्यावर मेट्रोच्या कारशेडच्या ४० हेक्टर जागेचा सर्व्हे पूर्ण झाला. त्यानंतर, आता तांत्रिक डिझाइन तयार करण्याचे काम एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू झाले होते. डिझाइनचे काम पूर्ण झाल्यावर पुढील प्रक्रिया हाती घेण्यात येणार आहे.वडाळा ते घोडबंदर-कासारवडवली या महत्त्वाकांक्षी मेट्रोच्या या मार्गासाठी १९ हजार कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला असून ३२ किमीच्या या मार्गामध्ये ३० स्थानके असणार आहेत. त्यातील २४ स्थानके भुयारी असणार आहेत. सहा स्थानके ही वरील बाजूस असणार आहेत, तर ठाण्यात एकूण १३ स्थानके असणार आहेत. ही सर्व स्थानके भुयारीच असणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.च्तीनहात नाका ते ओवळा कारशेडपर्यंत १३ स्थानके प्रस्तावित आहेत. यामध्ये तीनहात नाका, आरटीओ, वागळे, कॅडबरी, गोल्डन डाइज, कापूरबावडी, मानपाडा, पातलीपाडा, टिकुजिनीवाडी, आनंदनगर, वाघबीळ, कासारवडवली आणि ओवळा (कारशेड) अशी स्थानके आहेत. कारशेडच्या मुद्द्यावर श्रेय घेण्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जुंपली होती. त्या वेळी आरोप-प्रत्यारोपांचे राजकीय युद्ध रंगल्याने मेट्रोचे कारशेडच आता कारशेडला लागण्याची चिन्हे निर्माण झाली होती.च्ठाण्याच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यावश्यक असलेल्या या प्रकल्पाबाबत आपण त्वरित निर्णय घेऊन एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना या प्रकल्पाच्या कामास सुरुवात करण्याचे निर्देश द्यावेत व आपल्या हस्ते होणाऱ्या या प्रकल्पाच्या भूमिपूजनाची तारीखही निश्चित करावी, अशी मागणी ठाणेकरांकडून होत आहे. कारशेडसाठी ओवळा-भाईंदरपाडा येथील शॅलो वॉटर पार्ककरिता आरक्षित असलेल्या ६०० एकर जागेवर बाधितांना स्थलांतरित केले जाईल. कासारवडवलीतील २० ते २५ शेतकरी बाधित होणार आहेत.