शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत बांधकामाबाबत अधिकाऱ्यांवर कारवाई कधी?

By admin | Updated: November 11, 2015 00:01 IST

अनधिकृत बांधकाम प्रकरणात तीन नगरसेवकांचे पद आयुक्तांनी रद्द केल्यानंतर आणखी ११ नगरसेवकांवर पद गमावण्याची टांगती तलावर आहे.

अनधिकृत बांधकाम प्रकरणात तीन नगरसेवकांचे पद आयुक्तांनी रद्द केल्यानंतर आणखी ११ नगरसेवकांवर पद गमावण्याची टांगती तलावर आहे. अशा प्रकारे पहिल्यांदाच ठाणे महापालिकेत अनधिकृत बांधकामासंदर्भात नगरसेवकांवर कारवाई झाल्याने इतर नगरसेवकांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे आता अनधिकृत बांधकामात राहणाऱ्या नगरसेवकांबरोबर याकामांत सहकार्य करणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्याची चिन्हे आहेत. या अनधिकृत बांधकामांमध्ये काही नगरसेवकांच्या सहभागाची चर्चा सुरु झाली असतानाच त्यांना खतपाणी घालणाऱ्या आणि जाणूनबुजून दुर्लक्ष करणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांवरही कारवाई होणार का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे. ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अनधिकृत बांधकामात सहकार्य, अनधिकृत बांधकाम करणे आणि अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी गेलेल्या पालिका अधिकाऱ्याला मारहाण केल्या प्रकरणी मनसेचे नगरसेवक शैलेश पाटील, राष्ट्रवादीचे मनोहर साळवी आणि शिवसेनेचे राम एगडे यांचे नगरसेवक पद्द केले. परंतु,आजच्या घडीला सुमारे ७० टक्के नगरसेवक हे अनधिकृत बांधकामात राहत असल्याची माहिती या निमित्ताने समोर आली आहे. त्यामुळे या सर्वांवरच कारवाई होणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे. दुसरीकडे पालिका आयुक्तांनी अशा प्रकारे धाडसी पाऊल उचलून जी कारवाई केली आहे, त्याचे ठाणेकरांकडून कौतुक होत आहे. अशा प्रकारे यापूर्वीच जर कारवाईचा बडगा उगारला गेला असता तर शहरात आज अनधिकृत बांधकामे वाढलीच नसती असा सूर ठाणेकर व्यक्त करीत आहेत. या अनधिकृत बांधकामामध्ये यापूर्वी केवळ संबंधित विकासक, त्याठिकाणी राहणारा रहिवासी यांच्यावरच कारवाई केली जात होती. परंतु, आपल्या प्रभागात अशा प्रकारे अनधिकृत बांधकामांना खतपाणी घालणाऱ्या किंबहुना स्वत: अनधिकृत बांधकामे उभारणाऱ्या नगरसेवकांना पाठीशी घातले जात होते. मागील दोन वर्षापासून काही नगरसेवकांच्या बाबतीत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर काही प्रकरणे न्यायालयात गेली तर काहींवर महासभेने निर्णय घ्यावे असे निश्चित झाले. त्यानुसार पालिकेने अनेकवेळा, या नगरसेवकांचे नगरसेवकपद रद्द करण्याचे प्रकरण महासभेच्या पटलावर ठेवले होते. परंतु पक्षीय मतभेद बाजूला ठेवून सर्वपक्षीय सदस्यांनी हे प्रस्ताव फेटाळून लावत या नगरसेवकांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला. अखेर आयुक्तांनीच त्यांना दणका देऊन त्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या नगरसेवकांनीही चपराक लगावली आहे.शहरात आजच्या घडीला २ लाख २४ हजारांच्यावर अनधिकृत बांधकामे असून त्यात ५४४३ अनधिकृत इमारतींचा समावेश आहे. मागील २५ वर्षात ती शहरात उभी राहीली आहेत. ही बांधकामे केवळ विकासक, अथवा जमीन मालक यांच्यामुळे उभी राहली आहेत, का? तर याचे उत्तर नाही असे आहे. याला नगरसेवकही जबाबदार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यांच्या बरोबरच ती उभी राहीपर्यंत त्याकडे दुर्लक्ष करणारे पालिका अधिकारीही यात तितकेच दोषी आहेत. या अनधिकृत बांधकामांना नळ, वीज आणि इतर सुविधा पुरविणारे पालिका अधिकारीही यात दोषी ठरत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.