शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमधील तलावांचे वावडे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 02:10 IST

केडीएमसीच्या अर्थसंकल्पात डोंबिवलीतील एमआयडीसीतील गणपती विसर्जन तलावाच्या सुशोभीकरणासाठी २५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे

कल्याण : केडीएमसीच्या अर्थसंकल्पात डोंबिवलीतील एमआयडीसीतील गणपती विसर्जन तलावाच्या सुशोभीकरणासाठी २५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, तलावांचे शहर असलेल्या कल्याणमधील निम्याहून अधिक तलावांना कचरा कुंडीचे स्वरूप आले आहे. या तलावांच्या सुशोभीकरणाकडे महापालिका प्रशासनाने कानाडोळा केल्याचे स्पष्ट होत आहे. अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक असल्याचा दावा केला जात असताना दुसरीकडे फक्त डोंबिवलीतील एका तलावासाठी एवढ्या निधीची तरतूद का?, असा सवाल उपस्थित केला जात आहे.ठाणे जिल्हा हा तलावांचा जिल्हा. ठाण्यापाठोपाठ कल्याणला ही तलावांचे शहर संबोधले जाते. परंतु, कल्याणमधील अनेक तलाव सध्या कचऱ्याने भरलेले आहेत. पश्चिमेतील आधारवाडी तलाव असो अथवा पूर्वेतील वालधुनी पुलाशेजारील विठ्ठलवाडी तलाव ही त्याची ताजी उदाहरणे आहेत. या तलावांमध्ये कचºयाच्या प्लास्टिक पिशव्या भिरकावल्या जात असल्याने या तलावांचे डम्पिंगमध्ये रूपांतर झाले आहे. मात्र, त्याकडे केडीएमसीचे दुर्लक्ष झाले आहे. तलावांच्या विकासाकडे अर्थसंकल्पातही कानाडोळा करण्यात आला आहे. परंतु, डोंबिवली एमआयडीसीतील तलावाच्या सुशोभिकरणासाठी २५ लाखांची तरतूद केल्याने कल्याणमधील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. एमआयडीसी तलावाचे सुशोभीकरण करताने तेथे आबालवृद्धांना करमणुकीची साधने उपलब्ध करून दिली जाणार आहेत. हे योग्य असलेतरी कल्याणमधील अस्तित्व संपुष्टात आलेल्या तलावांना सापत्न वागणूक का?, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.नांदिवली तलाव, चिंचपाडा तलाव, हनुमाननगर तलाव यांची अवस्थाही दयनीय झाली आहे. या तलावांकडे वेळीच लक्ष न दिल्यास कल्याण हे तलावांचे शहर ही ओळख संपुष्टात येण्यास वेळ लागणार नाही, अशीही भावना नागरिकांनी व्यक्त केली. गणेशोत्सवाच्या वेळी या तलावांची साफसफाई केली जाते, पण उत्सव सरताच याचा वापर केवळ कचरा, निर्माल्य टाकण्यासाठीच होतो. विठ्ठलवाडी तलावाला कचºयामुळे गटाराचे स्वरूप आल्याने तेथे यंदाच्या गणेशोत्सवात गणपती विसर्जनास बंदी घालण्यात आली होती.स्मार्ट सिटी योजनेतून केवळ कल्याणच्या विकासाला प्राधान्य दिले गेले आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात डोंबिवलीत विकासकामे करण्यावर भर देण्यात आला आहे. असे असले तरी स्मार्ट सिटीच्या कामांना सुरुवातही झालेली नाही. त्यातच अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक असताना हा दुजाभाव का?, असाही सवाल केला जात आहे.तरतुदीची अंमलबजावणी व्हावीएमआयडीसीतील तलावाच्या सुशोभीकरणासाठी तरतूद केली गेली असलीतरी त्याची अंमलबजावणीही झाली पाहिजे. सध्या या तलावाकडे केडीएमसीचे पुरते दुर्लक्ष झाले आहे. महापालिकेने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, अन्यथा हा तलावही नामशेष होण्यास विलंब लागणार नाही, असे डोंबिवली वेलफेअर असोसिएशनचे सचिव राजू नलावडे म्हणाले. कल्याणला नेहमीच सापत्न वागणूकस्थायी समितीचे सभापतीपद आजवर बहुतांश वेळा डोंबिवलीला मिळाले आहे. त्यामुळे कल्याणला नेहमीच सापत्न वागणूक मिळाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी डोंबिवली शहराला घाणेरडे शहर, अशी उपमा दिल्याने कदाचित यंदा केविलवाणा प्रयत्न झाला असेल. कल्याण शहरातील तलावांची निगा योग्य प्रकारे न राखल्याने अनेक तलाव बुजून गेले. त्यामुळे जे तलाव अस्तित्वात आहेत, त्यांच्या संवर्धनासाठी तरतूद ठेवणे आवश्यक होती. पण तसे झालेले नाही, असे केडीएमसीचे माजी विरोधीपक्षनेते व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे म्हणाले.