शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे वनविभागाने जप्त केली २६ कोटींची व्हेलची उलटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:44 IST

ठाणे : ठाणे वनविभाग आणि मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट दहाच्या पथकाने संयुक्तपणे मुंबई उपनगरातील अंधेरी आणि मालाड येथील ...

ठाणे : ठाणे वनविभाग आणि मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट दहाच्या पथकाने संयुक्तपणे मुंबई उपनगरातील अंधेरी आणि मालाड येथील कारवाईमध्ये व्हेल माशांच्या उलटीची तस्करी करणाऱ्या राजेश मिस्त्री याच्यासह पाच जणांना नुकतीच अटक केली. त्यांच्याकडून २६ कोटींची उलटी जप्त केली आहे.

व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीसाठी काही जण मालाड आणि अंधेरी येथे येणार असल्याची माहिती ठाणे वनविभागाला मिळाली होती. त्याआधारे उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे, सहायक वनसंरक्षक गिरिजा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष कंक, वनअधिकारी प्रशांत देशमुख, शहापूरचे वनपाल रवींद्र तवर, नारायण माने, गणेश परहर आणि रामा भांगरे आदींच्या पथकाने १० जुलै रोजी मालाड येथून राजेश मिस्त्री, दिवाकर शेट्टी, दादाभाई घनवट आणि किरीटभाई वडवाना यांना सुमारे आठ किलोच्या उलटीसह अटक केली. दुसऱ्या कारवाईमध्ये सईद सिंबगथुल्ला (रा. कर्नाटक) याला १८ किलो ग्रॅम व्हेल माशाची विक्री करताना रंगेहाथ पकडले. या पाचही जणांना दोन दिवसांची वनकोठडी न्यायालयाने सुनावली आहे.

* व्हेल माशाची उलटी अतिशय दुर्मीळ मानली जाते. भारतीय बाजारपेठेत एक किलो उलटीची किंमत एक कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. आखाती देशात विशेषकरून दुबई, इंग्लंड आणि अमेरिका या देशांमध्ये व्हेल माशाच्या उलटीला मोठी मागणी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये एक किलो उलटीची किंमत तीन ते पाच कोटींपर्यंत सांगितली जाते.

* विशेष म्हणजे व्हेल माशाची ही उलटी समुद्राच्या पाण्यात बुडत नसून समुद्रातील क्षारामुळे ती खाऱ्या पाण्यावर तरंगते आणि गोळा होऊन वर्षभराचा प्रवास करून समुद्रकिनाऱ्यावर येते.

*यासाठी होते तस्करी...

माशाच्या उलटीचा वापर उच्च प्रतीचा परफ्युम तयार करण्यासाठी तसेच काही ठिकाणी औषध निर्मितीमध्ये होतो. काही ठिकाणी सिगारेट, मद्य आणि खाद्य पदार्थांमध्ये स्वाद वाढविण्यासाठीदेखील केला जातो. याची खरेदी-विक्री करणे हे वन्य प्राणी सुरक्षा अधिनियमांतर्गत बेकायदेशीर आहे. तरीही त्याची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते, अशी माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली.