शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

गायमुखचे मेट्रो कारशेड उद्योगपती वाडियांच्या हितासाठी

By admin | Updated: July 5, 2017 06:22 IST

घोडबंदर येथील प्रस्तावित मेट्रोचे प्रस्तावित कारशेड गायमुख येथे उद्योगपती वाडिया यांच्या हितासाठी हलविण्याच्या एमएमआरडीएच्या

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : घोडबंदर येथील प्रस्तावित मेट्रोचे प्रस्तावित कारशेड गायमुख येथे उद्योगपती वाडिया यांच्या हितासाठी हलविण्याच्या एमएमआरडीएच्या निर्णयास स्थानिक शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केला आहे. या निर्णयाने शेतकऱ्यांचे नुकसान होऊन गो एअरचे मालक वाडिया यांचा मोठा होणार असल्याचा आरोप या आशयाचे पत्रदेखील त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. कासारवडवली येथील मेट्रो कारशेडवर अद्यापही तोडगा निघत नसल्याने आणि गायमुख येथे कारशेड तयार केल्यास पुढे दहिसरला तेथून कनेक्टीव्हीटी मिळू शकेल, या उद्देशाने ते गायमुख येथे हलविण्याच्या हालचाली एमएमआरडीए आणि पालिकेकडून सुरु झाल्या आहेत. या प्रक्रियेसंदर्भात पालिकेने दुजोरा दिला असतांना आता या नव्या कारशेडलाच सरनाईक यांनी विरोध केला आहे. मेट्रो कारशेडचे आरक्षण पडल्यानंतर स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केला असता आपण स्वत: जागेवर उभे राहून एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करून सर्वेक्षण पूर्ण करून घेतल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे एकीकडे कासारवडवली येथील शेतकऱ्यांना योग्य मोबदला देऊन जमीन हस्तानंतरणाची प्रक्रि या सुरु असताना अचानक गायमुख येथील गो एअर कंपनीचे मालक वाडिया यांच्या जागेवर शेतकऱ्यांची नाराजी ओढवून कारशेडचे दुसरे आरक्षण कशासाठी असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच गायमुख येथील वाडिया यांच्या जागेवरील महापालिकेचे आरक्षण हटवणार असल्याने ठामपाचे मोठे नुकसान होणार असून वाडिया यांचा फायदा होणार आहे. अन्यथा उपोषण करणारवाडिया यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी गायमुख येथे कारशेडचे आरक्षण टाकणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अन्यथा शेतकऱ्यांच्या हितासाठी आपल्याला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशाराही त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात दिला आहे.