शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेकरांसाठी पाणीबाणी

By admin | Updated: June 5, 2016 03:11 IST

टंचाईमुळे ठाणेकरांना सध्या दोन दिवस पाणीकपातीचा सामना करावा लागत असतानाच शनिवारी घोडबंदर हाय वेवर असलेली ७०० मिमी व्यासाची जलवाहिनी सकाळी फुटली. त्यामुळे लाखो लीटर

ठाणे : टंचाईमुळे ठाणेकरांना सध्या दोन दिवस पाणीकपातीचा सामना करावा लागत असतानाच शनिवारी घोडबंदर हाय वेवर असलेली ७०० मिमी व्यासाची जलवाहिनी सकाळी फुटली. त्यामुळे लाखो लीटर पाणी वाया गेले. मात्र, मोठ्या प्रमाणात पाण्याचे लोट रस्त्यावर आल्याने बराच वेळ वाहतूककोंडीही झाली होती. जलवाहिनी फुटल्याने घोडबंदर पट्ट्यातील जवळपास दोन लाख रहिवाशांचा पाणीपुरवठा यामुळे खंडित झाल्याने आधीच आठवड्यातून चार दिवस टंचाईची झळ सोसणाऱ्या रहिवाशांना शनिवारीही निर्जळीचा सामना करावा लागला. स्टेम प्राधिकरणाची ही जलवाहिनी ३५ वर्षे जुनी असून तिच्या माध्यमातून घोडबंदर पट्ट्यातील रहिवाशांना पाणीपुरवठा केला जातो. सकाळी १० च्या सुमारास ती फुटली. त्यामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, अशी माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली. पाण्याच्या अतिदाबामुळे जलवाहिनी फुटल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून हा प्रकार घडल्यानंतर अर्ध्या तासात जलवाहिनीच्या दुरु स्तीच्या कामाला सुरु वात झाली. ही जलवाहिनी जमिनीच्या सहा ते सात फूट खाली असल्याने दुरु स्तीच्या कामातही अडचणी येत होत्या. पुरवठा बंद करून पाण्याचा निचरा झाल्यावरच दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. जलवाहिनीमधील पाणी घोडबंदर रोड तसेच आनंदनगर परिसरात पसरल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.पातलीपाडा आणि ओवळा परिसरातील रहिवाशांना जलवाहिनी फुटल्याचा सर्वाधिक फटका बसला. जलवाहिनी फुटली तेव्हा पाण्याचा दाब एवढा होता की, त्यामुळे रस्त्याचेही काही प्रमाणात नुकसान झाले. जलवाहिनी फुटल्यानंतर या परिसरातील पाणीपुरवठा बंद करेपर्यंत रस्त्यावर दीड फुटापर्यंत पाणी साचल्याची माहिती ग्रीन एकर गृहसंकुलातील रहिवासी आणि या घटनेचे प्रत्यक्षदर्शी विशाल गजरे यांनी दिली. (प्रतिनिधी)