शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
2
मेळाव्यात कोण कुठे बसणार? कुणाची भाषणं होणार? सगळं ठरलं; दोन्ही ठाकरेंचं १५ मुद्द्यांवर एकमत...
3
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
4
४ टक्के वाढू शकतो कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता; मोदी सरकार देऊ शकते मोठं गिफ्ट
5
टाटांच्या या कंपनीला मोठा धक्का! एका घोषणेने शेअर ९% घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले!
6
छत्रपती संभाजीनगर हादरलं; काळा गणपती मंदिराजवळ भीषण अपघात, दोन ठार, चार जखमी
7
Video: फरार विजय मल्ला अन् ललित मोदीची लंडनमध्ये ग्रँड पार्टी; ख्रिस गेलसह अनेकजण उपस्थित
8
तरुण दिसण्यासाठी भारतीय लाखो रुपये उधळतायेत? ग्लुटाथिओनची किंमत पाहून धक्का बसेल!
9
IND vs ENG: भारताने इंग्लंडच्या 'बॅझबॉल'ची काढली हवा, नवा रेकॉर्ड बनवला; पाकिस्तानला टाकले मागे
10
पंतप्रधान कमलांसह 38 मंत्री, 4 खासदार; PM मोदींच्या स्वागतासाठी पूर्ण मंत्रिमंडळ विमानतळावर दाखल
11
ज्यांना इंग्रजीत पत्रिका हवी, त्यांना इंग्लंडला पाठवा; सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा अहेर
12
भारतीय वंशाच्या तरुणाचा विमानात धिंगाणा; प्रवाशावर हल्ला, गळाच दाबला; व्हिडीओ व्हायरल
13
Kandenavami 2025 : शास्त्रात नसूनही आज शास्त्र समजून केली जाते कांदेनवमी; घरोघरी रंगतो कांदेभजीचा फक्कड बेत!
14
चीनमध्ये जिनपिंग पर्व संपुष्टात? १६ दिवसांपासून बेपत्ता; सत्तेतून बेदखल होण्याची चिन्हे....
15
"राक्षस मोकाट फिरतायेत...", मनसेची अमराठी हॉटेल मालकाला मारहाण; बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट
16
एक मिनिटात तत्काळ तिकीट, रेल्वेच्या नव्या नियमानंतर काढली अशी पळवाट, टेलिग्रामवर रॅकेट सक्रिय
17
अमित शाह पुणे दौरा: झाडाझडतीत तरुणाकडे मिळाले पिस्तुल, पोलिसांनी केले जप्त
18
Trump Putin Call: '...तोपर्यंत युद्ध थांबवणार नाही'; व्लादिमीर पुतीन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना ठणकावलं
19
कंत्राटे, टेंडर्सच्या मागे लागू नका; मतदारसंघाच्या हिताचा विचार करा, भाजप आमदारांना मुख्यमंत्र्यांनी दिला सल्ला
20
Pune Accident Video: कार थांबली, ते जवळ गेले अन् पाठीमागून...; काळजाचा ठोका चुकवणारा अपघात

पाणीकपातीचे महासंकट!

By admin | Updated: February 14, 2016 03:07 IST

सध्याच्या ३० टक्के पाणीकपातीमुळे आधीच नागरिकांच्या तोंडचे पाणी पळालेले असतानाच सोमवारपासून ही कपात वाढवून ४० टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सध्या

- सुरेश लोखंडे,  ठाणेसध्याच्या ३० टक्के पाणीकपातीमुळे आधीच नागरिकांच्या तोंडचे पाणी पळालेले असतानाच सोमवारपासून ही कपात वाढवून ४० टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सध्या वेगवेगळ्या शहरांत दोन दिवसांऐवजी तीन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. सध्याचा पाणीसाठा पाहता मार्चपासून पाणीकपात वाढेल आणि एक दिवसाआड पाणी पुरवण्याची वेळ येईल, असा तपशील ‘लोकमत’ने पंधरवड्यापूर्वी दिला होता. मात्र, टंचाई भीषण झाल्याने फेब्रुवारीच्या मध्यावरच पाणीकपात वाढली आहे. महापालिका, नगरपालिकांचा पाणीपुरवठा सध्या दोन दिवस बंद असतो आणि पुढच्या दोन्ही दिवशी कमी दाबाने पाणीपुरवठा केला जातो. आता अडीच दिवस पाणीपुरवठा बंद ठेवून उरलेल्या प्रत्येक दिवशी कमी दाबाने पाणीपुरवठा सक्तीचा केला जाणार आहे. त्यामुळे सोमवारपासून पाणीकपातीचे महासंकट ठिकठिकाणी अनुभवावे लागेल. मात्र, ही कपात जाहीर न करता थेट ६० तास पाणीबंदी अमलात आणण्याच्या सूचना दिल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. सध्या सोयीनुसार दोन दिवस पाणीकपात होईल, असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात आठवड्याला तीन दिवस कपात करून ४० टक्के पाण्याची बचत करण्याचे धोरण स्वीकारण्यात आले आहे. पण, ते एकदम लागू करून नागरिकांच्या संतापाला तोंड द्यावे लागू नये, म्हणून टप्प्याटप्प्याने कपात करून पाण्याच्या बचतीचे धोरण सर्व महापालिका, नगरपालिकांनी अमलात आणण्याची सक्ती लघुपाटबंधारे विभागाने केली आहे. पावसाने ओढ दिल्याने बारवी धरणासह आंध्र धरणात पाणीसाठा कमी आहे. कपातीद्वारे ही तूट भरून काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसे झाले तरच १५ जुलैपर्यंत पाणी पुरवणे शक्य होणार आहे. त्यासाठी ही सक्तीची कपात लागू करण्यात आली आहे. तिची अंमलबजावणी सोमवारपासून करताना प्रत्येक महापालिका, नगरपालिकेला सोयीनुसार अडीच दिवस पाणीबंद करून नंतरच्या प्रत्येक दिवशी कमी दाबाने पाणीपुरवठा करावा लागेल. आणखी कपातीच्या दिशेने यंत्रणांची वाटचाल सुरू३० टक्के कपातीनंतर पाणीटंचाईच्या संकटाला तोंड देण्यासाठी आता जादा १० टक्के छुपी कपात आठवडाभरात करायची आहे. यापैकी अडीच दिवस (६० तास) पाणी पूर्ण बंद ठेवून ३० टक्के कपात केली जाणार आहे.१० टक्के पाण्याची बचत पुढील प्रत्येक दिवशी कमी दाबाने पाणीपुरवठा करून उरलेले साडेचार दिवस केली जाईल. मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात पुन्हा ०५ टक्के वाढीव कपात लागू करून साधारणत: ४५ टक्के पाणीकपातीच्या संकटाला ठाणे जिल्ह्याला तोंड द्यावे लागणार आहे. ४० टक्के कपातीची अंमलबजावणी जवळजवळ सुरू झाली आहे. दोन दिवस पाणीबंद ठेवल्यास ३० टक्के आणि दररोज सात टक्के अशी प्रत्येकी ३७ टक्के कपात होईल आणि अर्धा दिवस पाणीबंद ठेवून हा कोटा भरून काढला जाईल, अशी ही नवी रचना आहे.फटका टेमघर प्राधिकरणाकडून आणि एमआयडीसीकडूनही शहाड-टेमघर प्राधिकरणाकडून दररोज २८५ दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणीपुरवठा होतो. तो मंगळवार, बुधवारी पूर्ण बंद ठेवला जाईल. त्यानंतर, पुढील दिवशी केवळ २६० एमएलडी पाणीपुरवठा होईल. याचा फटका ठाण्यासह भिवंडी, मीरा-भार्इंदर, महापालिका आणि भिवंडी तालुक्यातील ४० गावांना बसेल. याप्रमाणेच एमआयडीसीकडून उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, औद्योगिक वसाहती, नवी मुंबईत पाणीकपात केली जाईल; तर अंबरनाथ, बदलापूर या शहरांत जीवन प्राधिकरणाकडून सक्तीची पाणीकपात केली जाईल. ठाण्याची पाणीकपात वाढलीकल्याण-डोंबिवली महापालिकेवर एक दिवसाआड पाणीकपातीची टांगती तलवार असताना आता ठाणे शहराची पाणीकपात वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. पाणीबचत करण्यासाठी पालिका विविध माध्यमांतून जनजागृती करत असली तरीसुद्धा आता या आठवड्यापासून पालिकेने पाणीकपातीत वाढ केली असून ती मंगळवारपासून लागू केली जाणार आहे. त्यानुसार, शहरात २४ तासांवरून ४८ तास आणि कळवा, मुंब्रा आणि दिवा भागात ४८ तासांवरून ६० तासांचे शटडाऊन घेतले जाणार आहे.ठाणे शहराला आजघडीला ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून २००, मुंबई महापालिका ६०, एमआयडीसी १००, शहाड-टेमघर १०० असा एकूण ४६० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत आहे.शहरात आजघडीला ४५ टक्के गळती असल्याची बाब पालिकेनेच मान्य केली आहे. नियोजनातील अभाव, अनधिकृत जोडण्यांमुळे शटडाऊनव्यतिरिक्त इतर दिवशीही पाणीकपातीचा सामना करावा लागत आहे. ठाण्याची पाणीकपात वाढलीकल्याण-डोंबिवली महापालिकेवर एक दिवसाआड पाणीकपातीची टांगती तलवार असताना आता ठाणे शहराची पाणीकपात वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. पाणीबचत करण्यासाठी पालिका विविध माध्यमांतून जनजागृती करत असली तरीसुद्धा आता या आठवड्यापासून पालिकेने पाणीकपातीत वाढ केली असून ती मंगळवारपासून लागू केली जाणार आहे. त्यानुसार, शहरात २४ तासांवरून ४८ तास आणि कळवा, मुंब्रा आणि दिवा भागात ४८ तासांवरून ६० तासांचे शटडाऊन घेतले जाणार आहे.ठाणे शहराला आजघडीला ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून २००, मुंबई महापालिका ६०, एमआयडीसी १००, शहाड-टेमघर १०० असा एकूण ४६० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत आहे.शहरात आजघडीला ४५ टक्के गळती असल्याची बाब पालिकेनेच मान्य केली आहे. नियोजनातील अभाव, अनधिकृत जोडण्यांमुळे शटडाऊनव्यतिरिक्त इतर दिवशीही पाणीकपातीचा सामना करावा लागत आहे. कल्याण-डोंबिवलीपाठोपाठ कपातीचा फटका ठाणे शहरालाही बसला असून २४ तासांचे शटडाऊन ४८ तास आणि कळवा, मुंब्य्रातील शटडाऊन ४८ तासांवरून ६० तास केल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. यापूर्वी शहराचा पाणीपुरवठा हा बुधवारी रात्रीपासून बंद केला जात होता. परंतु, तो आता सोमवारी रात्रीपासून पुढील ४८ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. कळवा, मुंब्रा, दिवा या भागांचा पाणीपुरवठा पूर्वी बुधवार ते शुक्रवार असा बंद होता. परंतु, तो आता बुधवार ते शनिवारपर्यंत बंद राहणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. शहरातील घोडबंदर रोड, पाचपाखाडी, ऋ तुपार्क, साकेत, महागिरी, लोकमान्यनगर, नौपाडा, उथळसर, वागळे इस्टेट, पातलीपाडा, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, ओवळा, समतानगर, श्रीनगर, इंदिरानगर, गांधीनगर, रेतीबंदर, मुंब्रा कोळीवाडा, बॉम्बे कॉलनी, शैलेशनगर, संजयनगर व कळव्याचा काही भाग या परिसरांचा पाणीपुरवठा यापुढे सोमवारी रात्री १२ ते बुधवारी रात्री १२ पर्यंत बंद राहील.कळवा, मुंब्रा, दिव्याचा पुरवठा बुधवारी सायंकाळी ६ ते शनिवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद राहील. या काळात कळवा, मुंब्रा, दिवा, बाळकुमपाडा क्र .१, कोलशेतचा पाणीपुरवठा बंद असेल. यातून रेतीबंदर, मुंब्रा कोळीवाडा, शैलेशनगर, संजयनगर, बॉम्बे कॉलनी वगळली आहे. वंदना सिनेमाजवळ जलवाहिनी फुटलीआधीच ठाण्यावर पाणीकपातीचे संकट ओढवले असतानाच शनिवारी सकाळी वंदना सिनेमागृहाजवळ रस्त्याचे काम सुरू असताना खालून जाणाऱ्या दोन इंचांच्या जलवाहिनीला जेसीबीचा धक्का लागल्याने ती फुटल्याची घटना घडली. त्यामुळे येथील वंदना सिनेमा परिसर, एसटी कॉलनी आदी भागांचा पाणीपुरवठा बंद होता. वंदनाजवळ उड्डाणपुलासाठी साइड पट्टीचे काम सुरू आहे. ते सुरू असतानाच जेसीबीमुळे जलवाहिनी फुटली. यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाले. माहिती मिळताच पाणीपुरवठा विभागाने दुरुस्ती केली, पण पाणीपुरवठा बंद झाला होता.