मुरलीधर भवार कल्याण - कल्याणडोंबिवली महापालिकेच्या मोहिली येथील जलशुद्धीकरण केंद्रास पुन्हा एकदा पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. त्यामुळे उद्या कल्याण डोंबिवली परिसरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. 26 जुलै रोजी पडलेल्या पावसामुळे मोहिली जलशुद्धीकरण केंद्रात पावसाचे पाणी शिरले होते. त्यावेळी केंद्रातील पंप नादुरुस्त झाले होते. त्यामुळे 27 आणि 28 जुलै रोजी डोंबिवली पूर्व पश्चिम भागातील पाणी पुरवठा बंद पडला होता. तसेच केंद्राची दुरुस्ती केली तरी टिटवाळा परिसरातील पाणी पुरवठा सहा दिवस झाले तरी सुरळित झाला नव्हता. पुरवठा सुरळित झाला असताना आता पुन्हा पूराच्या पाण्याने केंद्र वेढले गेले आहे. त्यामुळे केंद्रात पुन्हा बिघड होणार आहे. त्यामुळे शहराच्या पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात येत आहे.
उद्या कल्याण डोंबिवली परिसरातील पाणी पुरवठा बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2019 20:26 IST
मोहिली जलशुद्धीकरण केंद्र पूराच्या पाण्याने वेढले
उद्या कल्याण डोंबिवली परिसरातील पाणी पुरवठा बंद
ठळक मुद्दे26 जुलै रोजी पडलेल्या पावसामुळे मोहिली जलशुद्धीकरण केंद्रात पावसाचे पाणी शिरले होते. पुरवठा सुरळित झाला असताना आता पुन्हा पूराच्या पाण्याने केंद्र वेढले गेले आहे.