शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

चिखलोली धरणातून १० ऑक्टोबरपासून पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 00:38 IST

मनसेचा पाठपुरावा; अंबरनाथ पूर्वेला दिलासा

अंबरनाथ : अंबरनाथचे चिखलोली धरण भरून वाहत असतानाही त्या धरणाचा पाणीपुरवठा बंद करून ठेवण्यात आला होता. या धरणातून अंबरनाथ पूर्व भागाला पाणीपुरवठा व्हावा यासाठी मनसेच्या वतीने पाठपुरावा करण्यात आला. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून १० आॅक्­टोबरपासून चिखलोली धरणातून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा निर्णय जीवन प्राधिकरणाने घेतला आहे.शहराला पाणीपुरवठा करणारे चिखलोली धरण पूर्णपणे भरलेले आहे. या धरणातून अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा केला जात नव्हता. धरणाचे पाणी प्रदूषित झाल्यामुळे मागील वर्षी पाणीपुरवठा राज्यमंत्र्यांच्या आदेशानंतर हा पाणीपुरवठा थांबवण्यात आला होता. पर्यायी व्यवस्था म्हणून एमआयडीसीकडून अंबरनाथ शहराला पाणी मिळत असले, तरी ते पुरेसे नसल्याने अंबरनाथ शहराच्या पूर्व भागाला प्रामुख्याने मोठ्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने १८ सप्टेंबरला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची भेट घेत चिखलोली धरणातून पाणीपुरवठा सुरू झाल्यास अंबरनाथकरांना पुरेसे पाणी मिळेल, या हेतूने चिखलोली धरणातून पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली होती. यासाठी १५ दिवसांचा अल्टिमेटम देऊन त्यानंतर धरणात आंदोलनाचा इशारा मनसेने दिला होता. याची दखल घेत चिखलोली धरणातून होणारा पाणीपुरवठा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने घेतला आहे. मात्र अनेक महिन्यांपासून चिखलोली धरणावरील जलशुद्धीकरण प्रकल्प बंद असल्याने डागडुजीची गरज असून त्याला आणखी ४ ते ५ दिवस लागणार आहेत. त्यामुळे १० आॅक्टोबरपासून धरणातून होणारा पाणीपुरवठा पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दिले आहे....आंदोलन करणार!लोकहितासाठी आणखी पाच दिवस आम्ही वाट बघणार असून त्यानंतर जर चिखलोली धरणातून पाणीपुरवठा सुरू झाला नाही, तर १२ आॅक्टोबरला मनसे चिखलोली धरणात उतरून आंदोलन करेल, असा इशारा मनसेचे जिल्हा संघटक संदीप लकडे आणि शहराध्यक्ष कुणाल भोईर यांनी दिला आहे.