शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा बांधकामामुळे पाणीटंचाईच्या झळा

By admin | Updated: March 8, 2017 04:13 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील २७ गावांमध्ये सुरू असलेल्या बेकायदा बांधकामांमुळे गावांमधील ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील २७ गावांमध्ये सुरू असलेल्या बेकायदा बांधकामांमुळे गावांमधील ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. याप्रकरणी आयुक्त ई. रवींद्रन यांच्याकडे तक्रार करूनही ते दखल घेतत नाही. त्यामुळे १५ मार्चला महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा भोपर परिसराच्या भाजपा नगरसेविका रविना माळी यांनी महापालिका प्रशासनास दिला आहे. २७ गावे केडीएमसीत १ जून २०१५ ला समाविष्ट झाली. त्यानंतर ती वगळण्यासाठी राज्य सरकारने एक प्राथमिक अधिसूचना काढली. गावे वगळावीत अथवा महापालिकेत ठेवावी, याविषयी सरकारच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. गावे वगळण्याची मागणी २७ गावे सर्वपक्षीय संघर्ष समितीने केली आहे. त्याचबरोबर ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गावे वगळण्याच्या भूमिकेपेक्षा माझी भूमिका वेगळी नाही, असे सूतोवाच दिले होते. महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे घोषणा करता येत नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. महापालिकेकडून गावांना मूलभूत सोयी-सुविधा पुरवल्या जात नसल्याची बाब माळी यांनी समोर आणली आहे. २७ गावांमध्ये बेकायदा बांधकामे सुरू असून, त्याविरोधात कारवाई करत नाही. बेकायदा बांधकामकांसाठी पाण्याचा बेसुमार वापर केला जात आहे. मात्र, भोपर गावाला प्यायलाही पाणी मिळत नाही. त्याचबरोबर प्रभागात स्वच्छतेचा प्रश्न आहे. पाणी व आरोग्याचा प्रश्न बिकट झाला आहे. महापालिकेतून गावे वगळली जाणार असल्यास त्यांच्या सोयीसुविधांवर कशाला निधी खर्च करायचा अशी मानसिकता आयुक्तांची असल्याचे दिसून येत आहे, असा आरोप माळी यांनी केला आहे.यापूर्वी शिवसेना नगरसेविका प्रेमा म्हात्रे यांनीही २७ गावांमध्ये बेकायदा बांधकामे सर्रासपणे सुरू असल्याचा आरोप स्थायी समिती सभेत केला होता. त्याचा अहवाल तयार करून कारवाई करण्याचे आश्वासन उपायुक्त सुनील लहाने यांनी दिले होते. मात्र, पुढे काहीच झाले नाही. तोच धागा पकडत माळी यांनी बेकायदा बांधकामे नागरिकांच्या तोंडचे पाणी पळवत आहेत, असा आरोप केला आहे. पिसवली प्रभागाच्या भाजपा नगरसेविका सुनीता खंडागळे यांनीही दोन आठवड्यांपूर्वी पाणी येत नसल्याचा आरोप करत महापालिका आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या देण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा भाजपा गटनेते वरुण पाटील यांच्या मध्यस्थीने प्रभागात पाणी सुरळीत होईल, असे आश्वासन कार्यकारी अभियंत्यांनी दिले होते. याबाबत खंडागळे यांना विचारले असता त्यांनी परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याचे सांगून संताप व्यक्त केला. (प्रतिनिधी)