शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकांमुळे निर्माण होते पाण्याची समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 00:28 IST

अंबरनाथ पश्चिम भागात पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ही जीवन प्राधिकरणावर आहे. मात्र पाणीपुरवठा सुरळीत करण्यात अपयशी ठरणारे अधिकारी नागरिकांना संभ्रमात टाकण्याचे काम करत आहेत

अंबरनाथ : अंबरनाथ पश्चिम भागात पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ही जीवन प्राधिकरणावर आहे. मात्र पाणीपुरवठा सुरळीत करण्यात अपयशी ठरणारे अधिकारी नागरिकांना संभ्रमात टाकण्याचे काम करत आहेत. नगरसेवकांमुळे पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याचा आरोप अधिकारी करत आहेत. अधिकाºयांच्या या विधानाला काँग्रेस नगरसेवकांनी कडाडून विरोध केला आहे. प्राधिकरण स्वत:चे अपयश लपवत नगरसेवकांना लक्ष्य करत असल्याचे नगरसेवकांनी स्पष्ट केले आहे. तसेच नगरसेवकांवर खोटे आरोप करणाºया अधिका-यांवर कारवाई करण्याची मागणी कार्यकारी अभियंंत्यांकडे केली आहे.मागील १५ दिवसांपासून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात जीवन प्राधिकरणाला अपयश येत आहे. अनेक ठिकाणी चुकीच्या पध्दतीने व्हॉल आॅपरेटिंग केले जात असल्याने अनेक भागांना पाणीपुरवठा होत नाही. तसेच अनेक भागांना गरज नसतानाही २० ते २२ तास पाणीपुरवठा होत आहे. त्याचा फटका जावसई गाव, फुलेनगर, कमलाकर नगर, कोहोजगाव, वांद्रापाडा, डीएमसी चाळ, नालंदानगर या भागांना होत आहे. जासवई परिसराला पाणीपुरवठा होत नसल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या नागरिकांना उत्तर देताना अधिकाºयांनी स्वत:ची जबाबदारी ही नगरसेवकांवर ढकलली. नगरसेवकांमुळे ही समस्या निर्माण होत असल्याचा आरोप अधिकाºयांनी करून या प्रकरणातून स्वत:ला बाजूला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र ज्या नगरसेवकांची नावे अधिकाºयांनी घेतली त्याच नगरसेवकांच्या प्रभागातही पाण्याचा प्रश्न आहे. असे असतानाही अधिकाºयांनी असे आरोप का केले याचा जाब विचारण्यासाठी नगरसेवक प्रदीप पाटील आणि उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात नागरिकांनी गोंधळ घातला. पाणी द्या नाहीतर खुर्ची खाली करा अशा घोषणा देत अधिकाºयांना धारेवर धरले.जीवन प्राधिकरणाचे अधिकारी पाणीपुरवठा करण्यात अपयशी ठरल्याने ते आपली जबाबदारी दुसºयावर टाकत असल्याचा आरोप पाटील यांनी केला. तसेच टँकर लॉबीला खूष करण्यासाठी आणि काही बांधकाम व्यावसायिकांना पाण्याची सोय करण्यासाठी काही भ्रष्ट अधिकारी नागरिकांना वेठीस धरत असल्याचा आरोप यावेळी नगरसेवकांनी केला.