शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

आजदेला महापालिकेच्या व्हॉल्व्हवरून पाणी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 00:18 IST

नगरसेवकाने केली मागणी : ऐन पावसाळ्यात भेडसावणाऱ्या टंचाईमुळे नागरिक आंदोलन करण्याची शक्यता

डोंबिवली : पूर्वेतील केडीएमसीच्या आजदे प्रभागात पाण्याचे समान वितरण होत नसल्याने दीड महिन्यापासून तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. एमआयडीसीकडून पूर्णवेळ पुरवठा होत नाही. तसेच तो कमी दाबाने होतो. महापालिकेकडूनही कमी पाणी येते. त्यामुळे या प्रभागासाठी महापालिकेच्या घरडा सर्कल येथील एअर व्हॉल्व्हवरून पुरवठा करावा, अशी मागणी स्थानिक नगरसेवक विनोद काळण यांनी केली आहे. यासंदर्भात काळण यांनी बुधवारी पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र देत त्यांना साकडे घातले.

आजदे प्रभागाची लोकसंख्या ३५ हजार असून त्याच्या तुलनेत अपुरा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे काळण यांनी नुकतीच स्वखर्चातून ३०५ मीटरची जलवाहिनी टाकली. मात्र, तरीही पाणीसमस्या सुटलेली नाही. गेल्या महिन्यापासून एमआयडीसीकडून होणारा पाणीपुरवठा हा २४ तासांवरून सहा तास जेमतेम होत असल्याने आजदेगाव, आजदेपाडा येथे पाणीच मिळत नाही. त्यामुळे नागरिक काळण यांच्याकडे तक्रार, गाºहाणी मांडत आहेत. काळण हेदेखील महापालिकेचे प्रभाग अधिकारी, एमआयडीसीचे अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करत आहेत. परंतु, त्यावर कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याने ते हैराण झाले आहेत. अखेरीस, त्यांनी महापालिका मुख्यालयाला पत्र लिहून पाणीसमस्या सोडवण्याची मागणी केली आहे. भरपावसाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. त्यामुळे कधीही महापालिका, एमआयडीसीविरोधात आंदोलन होऊ शकते, असा इशारा काळण यांनी दिला आहे. सात दिवसांमध्ये पाणीपुरवठ्यात सुधारणा करावी, अशी मागणी त्यांनी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, महापालिका आयुक्त गोविंद बोडके, ई प्रभागाच्या पाणीपुरवठा विभागाकडे पत्राद्वारे केली आहे.जास्त पुरवठा शक्य नाहीमीरा-भार्इंदरलाही जास्त पाणी सोडल्याने या ठिकाणच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाल्याची शक्यता आहे. आजदे प्रभाग हा मोठा असून तो एका टोकाला आहे. त्यामुळे मध्यरात्रीपासून पहाटे ५ वाजेपर्यंत पाणीपुरवठा एमआयडीसीकडून तेथे केला जातो. आजदेसाठी यापेक्षा जास्त पुरवठा करता येणे शक्य नाही, अशी माहिती डोंबिवली एमआयडीसीच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.विनोद काळण यांनी केलेली एअर व्हॉल्व्हवरून पाणीपुरवठ्याची मागणी ही रास्त नाही. तसे केल्यास शहरातील पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यातच त्यासंदर्भातील निर्णय माझ्या स्तरावर होऊच शकत नाही.- राजीव पाठक, कार्यकारी अभियंता, केडीएमसी 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाthaneठाणेdombivaliडोंबिवली