शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

पाणीचोरांना अभय, करदात्यांना भुर्दंड का?

By admin | Updated: February 16, 2017 02:01 IST

केडीएमसी हद्दीत पाण्याच्या हजारो बेकायदा जोडण्या आहेत. त्या शोधून दोषींवर कारवाई करण्याऐवजी प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या

कल्याण : केडीएमसी हद्दीत पाण्याच्या हजारो बेकायदा जोडण्या आहेत. त्या शोधून दोषींवर कारवाई करण्याऐवजी प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या नागरिकांच्या माथी कर आणि दरवाढ मारण्याची प्रशासनाची भूमिका चुकीची आहे, असे सुनावत स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे यांनी, करदरवाढीचा प्रस्ताव बुधवारच्या विशेष सभेत फेटाळून लावला. दरम्यान, मंगळवारीच म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेऊन कोणतीही करदरवाढ करणार नाही, अशी घोषणा केली होती. बुधवारी त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. महापालिका प्रशासनाने अग्निशमन करात दीड टक्का, तर पाण्याच्या दरात वाढ सुचवली होती. पाणीपुरवठा विभागातील आस्थापना खर्च, विद्युतदेयके, देखभालदुरुस्तीचा खर्च, रसायनांचा खर्च, पाण्याची रॉयल्टी आदी खर्चांत दरवर्षी होणारी वाढ, त्यात महापालिकेने जेएनएनयूआरएम योजनेसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी उत्पन्नात वाढ होणे आवश्यक असल्याकडे प्रशासनाने लक्ष वेधले होते. त्याचबरोबर अग्निशमन दल सक्षमीकरणाचे कारण पुढे करीत दीड टक्क्याने करात वाढ करण्याचा प्रस्तावही बुधवारच्या सभेत मंजुरीसाठी ठेवला. परंतु, करदरवाढीच्या प्रस्तावावर मुंबई, ठाणे आणि उल्हासनगर महापालिकांच्या निवडणुकांचे सावट होते. हे प्रस्ताव मंजूर झाल्यास वेगळा संदेश जाण्याची शक्यता असल्याने तूर्तास ते स्थगित ठेवले जाण्याची दाट शक्यता होती. त्यातच, मंगळवारी पत्रकार परिषदेत म्हात्रे यांनी करदरवाढ करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. स्थायीच्या सभेला बुधवारी सुरुवात होताच अन्य महापालिकांच्या तुलनेत केडीएमसीत कर अधिक असल्याचे सर्वच सदस्यांनी निदर्शनास आणून दिले. या जाचक करामुळे चोरवाटा शोधल्या जात असल्याकडे म्हात्रे यांनी लक्ष वेधले. (प्रतिनिधी)