शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे, भिवंडी, मीरा-भाईंदर शहरांमध्ये पाणीकपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 01:30 IST

स्टेम प्राधिकरणाची मुख्य जलवाहिनी शहाड येथे फुटली : दुरुस्तीस लागणार १४ तास लोकमत न्यूज नेटवर्क 

ठाणे : ठाणे शहराच्या विविध भागांत पाणीपुरवठा करणारी स्टेमची मुख्य जलवाहिनी शहाड मुख्य हेडक्वॉर्टरजवळ फुटल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. रात्री वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर, सकाळी ती फुटली. नदीपात्रात ती भूमिगत असल्याने तिच्या दुरुस्तीसाठी १२ ते १४ तास लागणार असल्याची महापालिकेने दिली.

       १८५० व्यासाच्या या जलवाहिनीतून ११६ दशलक्ष पाणीपुरवठा रोज होत आहे. त्यामुळे संपूर्ण ठाण्यासह मीरा-भाईंदर, भिवंडी शहरावर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस कमी दाबाने पाणी येणार असल्याची माहिती महापालिकेने दिली.    स्टेमच्या या जलवाहिनीचा वीजपुरवठा रात्री खंडित झाला होता. त्यानंतर, सकाळी ती एका ठिकाणी लिकेज झाली, तर अन्य एका ठिकाणी फुटली. सहा तासांत ३ वेळा वीज खंडित झाल्याने त्याचा परिणाम या जुन्या आणि ३० वर्षे जीर्ण झालेल्या जलवाहिनीवर झाला. ती ज्या ठिकाणी फुटली आहे, ती जागा नदीजवळ खाली असल्याने, दुरुस्तीसाठी स्टेम प्राधिकरणाला १२ ते १४ तास लागणार आहेत. 

   या संदर्भात महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे उपनगर अभियंता विनोद पवार यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, रात्री १२ नंतरच ती दुरुस्त होऊ शकणार आहे. त्यामुळे संपूर्ण ठाणे शहराच्या पाणीपुरवठ्यावर याचा परिणाम होणार आहे.

‘स्टेम’चा येथे होतो पाणीपुरवठास्टेम प्राधिकरणाच्या या जलवाहिनीतून ठाणे शहरासह मीरा-भाईंदर महापालिका, भिवंडी महापालिका आणि भिवंडी ग्रामीण भागालाही पाणीपुरवठा होतो. त्यामुळे या भागांचाही पाणीपुरवठा बंद केला आहे. स्वत:ची पाणीपुरवठा योजना असल्याने, त्याचा जास्तीचा परिणाम ठाणे शहरावर होणार नसला, तरी मीरा-भाईंदर आणि भिवंडीला पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान, पाण्याअभावी तेथील नागरिकांचे हाल होण्याची शक्यता आहे.

ठाणे शहरात झोननिहाय नियोजन; ठिकठिकाणी चार तास पुुरवठा राहणार बंद n ठाणे शहराला या जलवाहिनीतून ११६ दशलक्ष लीटर रोज पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे संपूर्ण शहराला पाणीकपातीची झळ बसण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणून महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून २१० दशलक्ष लीटर पाण्याचे झोननिहाय नियोजन करण्यात येणार आहे. n त्यानुसार, घोडबंदरचा पाणीपुरवठा चार तास बंद ठेवला जाणार आहे. त्यानंतर ठाणे शहराचा चार तास त्यानंतर उर्वरीत भागात चार तास पाणीपुरवठा बंद ठेवून कोणत्याही भागाला पाण्यापासून वंचित न ठेवता कमी दाबाने तो केला जाणार आहे.n यामुळे ठाणेकरांनी पाण्याचा अतिवापर न करता, जोपर्यंत जलवाहिनी दुरुस्त होत नाही, तोपर्यंत सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.