शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जल ठेकेदाराला दिला दणका, स्थायी समितीने दिली स्थगिती : ‘गोल्डन गँग’ने कामे आणल्याचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 02:15 IST

केडीएमसीतील विविध प्रभागांत पाणीपुरवठा देखभाल व दुरुस्तीच्या कामांचे विषय मंगळवारच्या स्थायी समितीच्या सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते.

कल्याण : केडीएमसीतील विविध प्रभागांत पाणीपुरवठा देखभाल व दुरुस्तीच्या कामांचे विषय मंगळवारच्या स्थायी समितीच्या सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. मात्र, त्यापैकी राजेश कन्स्ट्रक्शन या कंत्राट कंपनीची २ कोटी २१ लाख रुपये खर्चाची कामे संशयास्पद असल्याचा आरोप करून ती स्थगित ठेवण्याचा निर्णय सभापती रमेश म्हात्रे यांनी घेतला. ही कामे पालिकेतील गोल्डन गँगशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. पाणीपुरवठ्याच्या देखभाल दुरुस्तीच्या अन्य २ कोटी १० लाख रुपये खर्चाचे पाच विषय मंजूर करण्यात आले आहे.देखभाल, दुरुस्तीचा विषय सभेत मंजुरीसाठी आला असता भाजपा सदस्य विकास म्हात्रे यांनी दोन वर्षांपूर्वी अशाच प्रकारची देखभाल दुरुस्तीची कामे मंजुरीसाठी आली होती. तेव्हाही सभापती म्हात्रे हेच होते. तीच कामे पुन्हा मंजुरीसाठी आणल्याचा संशय म्हात्रे यांनी व्यक्त केला. त्यावर पाणीपुरवठ्याची देखभाल दुरुस्ती गरजेची असल्याने सदस्य त्याला तातडीने मंजुरी देतात. मात्र, व्हॉल्व्हमन, प्लंबर, कामगार हे देखील कंत्राटदारामार्फत घेतले जातात. हे कामगार कंत्राटदाराचे असल्याने ते सदस्यांना जुमानत नाहीत. बाजारात एका कामगाराला दिवसाला ५०० रुपये मजुरी दिली जाते. हे कामगार २६२ ते ३८० रुपये मंजुरीवर कंत्राटदाराला कसे परवडते, असा सवाल सभापतींनी केला.महापालिकेत १९९७ पासून व्हॉल्व्हमन, प्लंबर यांची भरती झालेली नाही. ती का झालेली नाही. पालिका कंत्राटदाराला चालवायचा द्यायची आहे का?, असा प्रश्न त्यांनी केला. कंत्राटदार हा ५० लाखांचे काम घेते. प्रत्यक्षात तो २० लाखांचेच काम करतो. त्याला कसे काय परवडते. कंत्राटदार या कामात फालका मारतो. त्यात भ्रष्टाचार आहे. हा प्रकार रोखला पाहिजे, असा मुद्दा सभापतींना उपस्थित केला. त्याला शिवसेना सदस्य दशरथ घाडीगावकर यांनी दुजोरा दिला. राजेश कन्स्ट्रक्शनच्या कामाविषयी घाडीगावकर यांनीही संशय व्यक्त केला. कंत्राटदार अत्यावश्यक कामाला मंजुरी मिळणार म्हणून अधिकाºयांच्या मार्फत हे प्रस्ताव मंजुरीसाठी आणतो. त्याला अत्यावश्यक बाब म्हणून सभाही मंजुरी देते. मात्र, त्यापूर्वी खरोखरच काम योग्य प्रकारे केले जाणार आहे की नाही, याची देखील शहानिशा करणे आवश्यक असल्याचा मुद्दा घाडीगावकर यांनी मांडला.याविषयी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक यांनी सांगितले की, दोन वर्षांत देखभाल दुरुस्तीच्या कामाला मंजुरी दिलेली नाही. पाच वेळा निविदा मागवूनही त्याला प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे विकास म्हात्रे यांचा संशय रास्त नाही. व्हॉल्व्ह मन, प्लंबर याची पदे भरली गेली नाही, ही वस्तूस्थिती आहे. मनुष्यबळ कमी असल्याने कंत्राटदाराकडून ही कामे करून घेतली जातात. उपायुक्त धनाजी तोरस्कर यांनी व्हॉल्व्ह मन, प्लंबर आणि कामगारांची रिक्त पदे भरण्याचा प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाने तयार करून प्रशासनास सादर करावा, असे आदेश दिले आहेत.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका