शहरं
Join us  
Trending Stories
1
लाच घेताना व्हिडीओ बनवायला सुरुवात केली, मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न; मुंबईतील ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल
2
एक फोन कॉल, ज्येष्ठ मंत्र्यांशी वाद अन् तयार झाली जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याची स्क्रिप्ट?
3
Crime News : संतापजनक! महिलेला घरी सोडतो सांगून जंगलात घेऊन गेले; तिघांकडून सामुहिक बलात्कार, जळगावातील घटना
4
आजपासून IPO गुंतवणुकीसाठी खुला, लॅपटॉप रिपेअरिंगमधून कोट्यवधी कमावते कंपनी; GMP ₹१०० पेक्षाही जास्त
5
पुरुषांसाठीच्या गर्भनिरोधक गोळीची चाचणी यशस्वी; शरीरात गेल्यावर कसं करते काम?
6
टँक फुल अन् आंबा घाटापर्यंतचा प्रवास! स्कोडा कायलॅकने चकीत केले; परत पुण्यात येताना एवढे मायलेज दिले...
7
"मी म्हटलं गणपती स्वत: मला घ्यायला येईल आणि खरंच...", संकर्षणने सांगितला गणपतीपुळ्याचा अंगावर शहारे आणणारा प्रसंग
8
कष्टाचं फळ! हात मोडला, दीड वर्ष शाळा सोडली, स्टेशनवर राहण्याची आली वेळ; होणार डॉक्टर
9
पाकिस्तान चाचणी करायला गेला...! आपल्याच मिसाईलपासून थोडक्यात वाचला, अणु केंद्राजवळ कोसळली
10
Wife Crime: तिने पतीला घरातच पुरलं, पण एका चुकीमुळे सगळं उघडं पडलं; नालासोपारातील हत्येची Inside Story
11
टाटा, LG, PhonePe सह अनेक कंपन्यांचे IPO येणार! 'या' वर्षातील सर्वात मोठा IPO हंगाम, बंपर कमाईची संधी!
12
हे आहेत ८८ वर्षांचे माजी IPS अधिकारी, रोज सकाळी स्वच्छतेसाठी उतरतात रस्त्यावर; Video पाहून तुम्हीही भावुक व्हाल...
13
जॉब सोडला अन् शेती केली, MBA पास तरुणीची कमाल; टोमॅटो विकून करतेय कोट्यवधींची कमाई
14
"मराठीसारखं काम करु नका यार", हिंदी दिग्दर्शकाचं बोलणं ऐकून छाया कदमने शूटिंगच थांबवलं
15
Deep Amavasya 2025: दीप अमावास्येला तुमच्यावरही होऊ शकते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतकथा आणि लाभ!
16
'वृत्तपत्रातून पती-सासऱ्याची माफी मागा', पदाचा गैरवापर करणाऱ्या IPS पत्नीला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले
17
Crime News : पत्नी पतीसमोर प्रियकरासोबत शारीरिक संबंध ठेवायची; नाराज पतीने उचलले टोकाचे पाऊल
18
मुकेश अंबानींच्या रिलायन्सविरोधात सरकार सर्वोच्च न्यायालयात, जाणून घ्या काय आहे प्रकरण?
19
'देश चालवण्यासाठी भीक मागावी लागते', युनूस यांनी विमान अपघाताबाबत केलेल्या पोस्टवर लोक संतापले
20
Post Office च्या 'या' स्कीममध्ये मिळतंय सर्वाधिक व्याज; गॅरंटीड रिटर्न सोबत बनेल पैसाच पैसा

पाणी दरवाढीला आज मंजुरी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 04:18 IST

केडीएमसी प्रशासनाचा प्रस्ताव स्थायी समितीत : गळती, चोरी रोखण्यात आले अपयश

कल्याण : केडीएमसी हद्दीत ३० तास पाणीकपात लागू असताना आता प्रशासनातर्फे पाणी दरवाढीचा प्रस्ताव बुधवारच्या स्थायी समितीच्या सभेत मांडला जाणार आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ समितीकडून फेटाळली जाण्याची शक्यता आहे. आधीच अपुरा पाणीपुरवठा होत असताना पाणीगळती व चोरी रोखण्यातही प्रशासनाला यश आलेले नाही. त्याकडे दुर्लक्ष करून नियमित पाणीबिले भरणाऱ्यांवर पाणी दरवाढ लादण्यात काय अर्थ आहे? असा सवाल केला जात आहे.

सध्या महापालिका प्रति एक हजार लिटर पाणीपुरवठ्यासाठी सात रुपये दर आकारते. त्यात तीन रुपयांची वाढ प्रशासनाने प्रस्तावित केली आहे. त्यामुळे प्रति एक हजार लिटर पाण्यासाठी ग्राहकांना १० रुपये मोजावे लागतील. त्यापेक्षा जास्त पाण्याचा वापर करणाºया ग्राहकांकडून १० रुपयांऐवजी २० रुपये दर आकारला जाईल. त्यामुळे जास्त पाणी वापरणाºयांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.‘पाणीपुरवठा विभागाकडून पाणीगळती रोखली जात नाही. हजारो बेकायदा नळजोडण्यांद्वारे दररोज पाणीचोरी होते. परंतु, पाणीपुरवठा विभागाला नियमित पाणीबिले भरणाºया ग्राहकांच्या माथी ही दरवाढ मारायची आहे. पाणी फुकट पिणाºयांचा भार बिले भरणाºयांनी का सोसायचा,’ असा सवाल शिवसेनेचे स्थायी समिती सदस्य वामन म्हात्रे यांनी केला आहे.

‘महापालिकेने चुकीच्या पद्धतीने पाणीपुरवठा योजनांचे नियोजन केले आहे. त्यासाठी घेतलेले कर्ज पालिका बिल भरणाºया ग्राहकांच्या जीवावरच फेडत आहे. महापालिका हद्दीतील लोकसंख्या १६ लाख आहे. महापालिकेकडून दररोज होणारा पाणीपुरवठा व प्रत्यक्षात लोकसंख्या पाहता जास्तीचे पाणी कोण वापरत आहे? यातील फरक ६५ दशलक्ष लिटरचा आहे. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने ही दरवाढ प्रस्तावित केली आहे. नागरिकांना पुरेसे पाणी द्या, पाणीचोरी रोखा,’ अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी केली आहे.६५ दशलक्ष लिटर पाणी मुरते कुठे?, पालिकेकडे लेखाजोखा नाहीप्रशासनातर्फे दरवर्षी पाणी दरवाढीचा प्रस्ताव ठेवला जातो. मात्र, स्थायी समिती व महासभेकडून तो फेटाळला जातो. महापालिका दररोज ३१० दशलक्ष लिटरचा पाणीपुरवठा महापालिका हद्दीत करते. याव्यतिरिक्त २७ गावांत ३० दशलक्ष पुरवठा एमआयडीसीकडून केला जातो.त्याचे बिल महापालिका एमआयडीसीला भरते. एका व्यक्तीला १५० लिटर पाणी लागते. महापालिका पुरवित असलेले पाणी, लोकसंख्येचा निकष व दरडोई पुरवठ्याचा लिटरचा हिशेब पाहता २४५ दशलक्ष लिटर पाणी महापालिकेस पुरेसे आहे. त्या व्यतिरिक्त ६५ दक्षलक्ष लिटर पाणी कुठे मुरते, याचा लेखाजोखा महापालिकेकडे नाही.गळती कधी रोखणार?महापालिकेने २००९ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार २१.५ टक्के इतकी पाणीगळती आहे. ती रोखण्यासाठी काही उपाययोजना महापालिकेच्या हाती नाही. महापालिकेने ९० हजार पाणीमीटर बसविले आहेत. त्याचे बिलिंग मीटर प्रमाणे कार्यान्वित झालेले नाही. त्यामुळे पाण्याचा वापर कोण किती करतो, याचे मोजमाप नाही.पाणीपुरवठा देखभालदुरुस्तीचा खर्चपाणी शुद्धीकरणासाठी : २ कोटी रुपयेआस्थापना : १८ कोटी रुपयेकर्जाचा हप्ता : २० कोटी रुपयेलघु पाटबंधारे व एमआयडीसी : १८ कोटी रुपयेविजेचे बिल : ४० कोटीजलवाहिनी टाकणे : ५० कोटी रुपयेएकूण : १४८ कोटी रुपयेकर्जाचा हप्ता २० कोटींचाजवाहरलाल नेहरू नागरी पुनर्रुत्थान अभियानातून केडीएमसीने १५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा उभारली आहे. त्यासाठी महापालिकेने एमएमआरडीएकडून २३३ कोटींचे कर्ज घेतले होते. त्याचा दरवर्षी २० कोटींचा कर्जाचा हप्ता महापालिका २०१३ पासून देते, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आतापर्यंत १०० कोटीचे कर्ज फिटले तर उर्वरित १३३ कोटींचे कर्ज फेडणे बाकी आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका