शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

शराब, कबाब अन लक्ष्मीदर्शनावर वॉच

By admin | Updated: January 25, 2017 04:53 IST

सार्वत्रिक निवडणूक सुरळीत पार पडावी या उद्देशाने ठाणे महापालिकेने कंबर कसली असून यंदा प्रथमच भरारी पथकांच्या मदतीला राज्य

ठाणे : सार्वत्रिक निवडणूक सुरळीत पार पडावी या उद्देशाने ठाणे महापालिकेने कंबर कसली असून यंदा प्रथमच भरारी पथकांच्या मदतीला राज्य उत्पादन शुल्क अधिकारी असणार आहेत. त्यामुळे मांस, मद्य, पैशांच्या उधळपट्टीवर या संयुक्त भरारी पथकाचा वॉच असणार आहे. यासाठी ठाणे महापालिकेने चार वेगवेगळ्या प्रकारची भरारी पथके स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली तीन अशी ३६ पथके स्थापन केली जाणार आहेत. त्याशिवाय तीन मध्यवर्ती, ३६ व्हिडिओग्राफरचा समावेश असलेली १२ चलछायाचित्रण दक्षता पथके आणि ९ ते १० तपासणीनाके पथकांची स्थापन केली जाणार आहे. याची पूर्ण तयारी आता पालिकेने केली असून येत्या काही दिवसात ही पथके कामाला लागणार असल्याचे पालिकेच्या निवडणूक विभागाने स्पष्ट केले. या संदर्भात नुकतीच एक बैठक घेण्यात आली. यावेळी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली या पथकांच्या स्थापनेसाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलीस, आरटीओ अधिकारी बैठकीला उपस्थित होते. त्यात हा निर्णय घेण्यात आला. निवडणुकांसाठी १२ निवडणूक निर्णय अधिकारी नेमले असून त्यांच्याकडे प्रत्येकी तीन पथके तैनात असणार आहेत. त्यात प्रत्येकी पालिका किंवा सरकारचा एक अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक किंवा हेड कॉन्स्टेबल दर्जाचा एक कर्मचारी आणि एक व्हिडिओग्राफर तैनात केला जाणार आहे. मध्यवर्ती पथकात वर्ग दोन दर्जाचा सरकारी अधिकारी, उपनिरीक्षक दर्जाचा पोलीस अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क आणि आरटीओकडील प्रत्येक एक अधिकारी, एक शिपाई आणि एक व्हिडिओग्राफर असणार आहे. प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली दोन व्हिडिओग्राफर कार्यरत असून वादग्रस्त आणि आक्षेपार्ह घटनांचे छायाचित्रणही ते करतील, अशी माहिती चव्हाण यांनी दिली. मतदानाला पाच ते सहा दिवसांचा अवधी शिल्लक असतांना ‘लक्ष्मीदर्शन’ आणि मद्य वाटपांचे काम मोठ्या प्रमाणात होत असते. त्यावर अकुंश बसवण्यासाठी नाका तपासणी पथकेसुद्धा तैनात ठेवली जाणार आहेत. शहरभरात प्रत्येक दिवशी ९ ते १० ठिकाणी चेकपोस्ट उभारल्या जाणार असून त्या पथकांमध्ये दोन पोलीस अधिकारी, एक सरकारी अधिकारी आणि एका व्हिडिओग्राफरचा समावेश असेल असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)