शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

उघड्यावर जाणाऱ्यांवर पुन्हा वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 00:30 IST

स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्यातील ग्रामीण भाग पूर्णत: हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या

नारायण जाधवठाणे : स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्यातील ग्रामीण भाग पूर्णत: हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या पंधरवड्यात केल्यानंतर नगरविकास विभागाने आता नागरी भागातील हागणदारीमुक्तीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. आॅक्टोबर २०१७ मध्ये राज्यातील नागरी भाग हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा केली असली तरी त्यात सातत्य राखले जात नसल्याने शासनाने सर्व नागरी संस्थांना वैयक्तिक शौचालय बांधणीचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी ३० मे २०१८ ची डेडलाईन दिली आहे.नगरविकास विभाग एवढ्यावरच थांबला नसून बांधण्यात आलेल्या वैयक्तिक शौचालयांचे जिओ टॅगिंग करून ती आधारशी संलग्न करण्याचे बंधन घातले आहे. याशिवाय पुढील तीन महिने उघड्यावर शौचास बसणाºयांवर वॉच ठेवण्याची मोहीम उघडण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे हागणदारीमुक्तीस बळ मिळेल, असा विश्वास शासनाला वाटत आहे.संपूर्ण भारत देश आॅक्टोबर २०१९ पर्यंत स्वच्छ करण्याच्या उद्देशाने २ आॅक्टोबर २०१४ रोजी देशभर ‘स्वच्छ भारत अभियाना’स सुरूवात झाली. घनकचरा व्यवस्थापन आणि हागणदारी मुक्त देश ही उद्दीष्ट यासाठी ठेवली होती. आॅक्टोबर २०१७ मध्ये राज्यातील नागरी भाग हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा करण्यात आली. परंतु, त्यात सातत्य नसल्याचे आढळले आहे. शिवाय अनेक कुटुंबानी अनुदानाचा पहिला हप्ता घेऊन उर्वरीत काम पूर्ण न करता उघड्यावर जाणे पसंत केल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे संपूर्ण शहर हागणदारीमुक्त होण्यात अडचणी येत आहेत. जी शहरे यापूर्वी हागणदारीमुक्त झाली होती, त्या शहरांत पुन्हा उघड्यावर जाणाºयांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे सर्व महापालिकांसह नगरपालिकांनी पुढील तीन महिने आपल्या कार्यक्षेत्रात दररोज सकाळी उघड्यावर शौच करणाºयांवर वॉच ठेवण्याची मोहीम पुन्हा उघडावी, असे बजावण्यात आले आहे. राज्यातील शहरांचा हागणदारीमुक्त शहर हा दर्जा टिकवण्याकरीता सार्वजनिक व वैयक्तिक शौचालयांची उत्तम देखभाल करणे गरजेचे असून याकरीता त्याठिकाणी वीज, पाण्याची अखंड उपलब्धता असणे आवश्यक आहे. तसेच शौचालयांचे दरवाजे, शौचकुपे व्यवस्थीत असणे आवश्यक आहे. त्यानुसार सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना दक्ष राहण्यास बजावण्यात आले आहे.