शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाकडून तरुणाची धुलाई

By admin | Updated: October 9, 2016 04:07 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आपत्तीजनक छायाचित्रे फेसबुकवर टाकणाऱ्या मोबिनच्या शोधार्थ गणेश देवलनगरमध्ये आलेल्या भाजपा, विहिंप व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी अब्दुल कलाम

मीरा रोड : पंतप्रधान नरेंद्र मोदींची आपत्तीजनक छायाचित्रे फेसबुकवर टाकणाऱ्या मोबिनच्या शोधार्थ गणेश देवलनगरमध्ये आलेल्या भाजपा, विहिंप व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी अब्दुल कलाम याला विनाकारण लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची तक्रार कलाम याने केली आहे. पोलिसांनी अद्याप मारहाण करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली नाही.भार्इंदर पश्चिमेकडील गणेश देवलनगरमध्ये रामाग्या यादव यांची खोली असून त्यांनी ती गेल्या दोन वर्षांपासून मोबिन अहमद यास भाड्याने दिली आहे. स्टील कारखान्यात काम करणारा मोबिन हा आपल्या अन्य तिघा सहकाऱ्यांसह राहतो. मोबिन याने फेसबुकवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विडंबनात्मक छायाचित्रे टाकल्याने भाजपा, विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे कार्यकर्ते मोबिनला मारण्यासाठी शुक्रवारी रात्री उशिरा दुचाकीवरून तो राहत असलेल्या घरात शिरले. त्यावेळी मोबिन त्यांना सापडला नाही. मात्र, मोबिनसोबत राहणारा अब्दुल कलाम याला त्यांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.या धटिंगणशाहीची दखल घेऊन मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे सोडून पोलिसांनी कलाम याला पोलीस ठाण्यात आणून चौकशीसाठी बसवून ठेवले. घराचा मालक रामाग्या यादव यालाही चौकशीला आणले. मूळ मारहाणीेची चौकशी करायचे सोडून यादवने खोली भाड्याने देताना पोलीसांचे नाहरकत प्रमाणपत्र न घेतल्याने कलाम व यादव यांनाच फैलावर घेतले.बजरंग दलाचे गौरांग कंसारा, भाजपा युवा मोर्चाचा विनोद शिंदे, विहिपचे कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात जमून कलाम व यादव यांच्यावर गुन्हा दाखल करून अटकेची मागणी केली. (प्रतिनिधी)आपण काही केलेले नाही. फेसबुकवर कुणी काय पोस्ट टाकली, तेही आपल्याला माहीत नाही. अचानक रात्री गुंड घरात शिरले व मारहाण करू लागले. पोलिसांनी मला मारहाण झाल्याची ना तक्रार घेतली, ना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई केली.- अब्दुल कलामआम्ही कुणालाही मारहाण केलेली नाही. अन्य कुणी लोकांनी मारहाण केली असेल. मात्र, पोलिसांची पूर्वपरवानगी न घेता खोली भाड्याने देणाऱ्या आरोपीला अटक करण्याची मागणी केली आहे. -विनोद शिंदे, सचिव, भाजपा युवा मोर्चा फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या मोबिनचा आम्ही शोध घेत आहोत. याबाबत, तक्रार आली असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार तक्रारी व घडलेला प्रकार सरकारी वकिलांकडे कायदेशीर सल्ल्याकरिता पाठवला आहे. त्यांचा अभिप्राय आल्यावर पुढील कारवाई केली जाईल.-अनिल कदम, वरिष्ठ निरीक्षक, भार्इंदर पोलीस ठाणे