शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वॉर्ड बॉय भरतीवरून महासभेत गदारोळ

By admin | Updated: December 22, 2016 05:59 IST

कळवा रुग्णालयातील वॉड बॉय भरतीचा मुद्दा स्थायीनंतर, मंगळवारी झालेल्या महासभेतदेखील चांगलाच गाजला. दुसरीकडे

ठाणे : कळवा रुग्णालयातील वॉड बॉय भरतीचा मुद्दा स्थायीनंतर, मंगळवारी झालेल्या महासभेतदेखील चांगलाच गाजला. दुसरीकडे सदस्यांनी पालिकेने केलेल्या स्टुलमॅनच्या भरतीवरदेखील यावेळी आक्षेप घेतला. स्टुलमनच्या सुधारित यादीत जुन्या यादीमध्ये नसलेल्या उमेदवारांची नावे टाकल्याचा मुद्दा उपस्थित करून नजीब मुल्ला यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले. मात्र, मुल्ला यांनी अशी नावे जाहीर केल्यास २४ तासांच्या आत यासंदर्भातील अहवाल सादर केला जाईल आणि मुल्ला यांची माहिती खोटी ठरल्यास त्यांनी आपले आरोप सभागृहातच मागे घेण्याचे आव्हान आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सभागृहात दिल्याने सभागृहाचे वातावरण चांगलेच तापले होते. स्थायी समितीमध्ये वॉर्ड बॉयची भरती रद्द करण्याचे आदेश असताना अजूनही सर्व वॉर्ड बॉय कामावर रु जू असल्याचा मुद्दा मुल्ला यांनी उपस्थित केला. तर ही भरती प्रक्रि या राबवताना जाहिरात देण्यात आली नसून शासनाच्या अध्यादेशाचेदेखील पालन केले नसल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले. रामभाऊ तायडे यांनी हॉस्पिटलच्या डीन, अधीक्षक कोरडे यांची चौकशी करण्याची मागणी यावेळी केली. ही संपूर्ण भरती तात्पुरती असल्याचे अतिरिक्त आयुक्त रणखांब यांनी सांगूनही समाधान न झाल्याने ही भरती प्रक्रि या रद्द करून चौकशी करण्याचे आदेश महापौर संजय मोरे यांनी सभागृहामध्ये दिले. स्टुलमॅनच्या भरतीसंदर्भात यापूर्वी सदस्यांनीघेतलेल्या आक्षेपांवर एक समिती स्थापन करून चौकशी अहवाल सभागृहासमोर सादर करावा असा ठराव झाला असतानाही तो सभागृहासमोर न आणता परस्पर आयुक्तांकडे पाठवल्याचा मुद्दा चांगलाच गाजला. भरतीसंदर्भात आक्षेप आणि तक्र ारी या समितीकडून मागवल्या होत्या. मात्र, त्या कोणत्या स्वरूपातील होत्या, असा प्रश्न नगरसेवक हिरा पाटील यांनी केला. प्रशासनाकडून उत्तर देताना उपायुक्त मुख्यालय निपाणी यांनी यासंदर्भात चौकशी अहवाल तयार करून तो आयुक्तांना सादर केल्याची माहिती दिली. निपाणीच्या या उत्तरानंतर मुल्ला यांनी आक्षेप घेऊन ठराव सभागृहाचा असताना या ठिकाणी अहवाल सादर करणे आवश्यक असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)