शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

घराची भिंत कोसळून कळव्यात तिघे जखमी

By admin | Updated: July 4, 2017 06:47 IST

कळव्यातील वाघोबानगर परिसरात घराची भिंत खाली असलेल्या घरांवर कोसळल्याने झालेल्या दुर्दैवी घटनेत तीन जण जखमी झाल्याची घटना घडली

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कळव्यातील वाघोबानगर परिसरात घराची भिंत खाली असलेल्या घरांवर कोसळल्याने झालेल्या दुर्दैवी घटनेत तीन जण जखमी झाल्याची घटना घडली. या तिघांवर कळव्यातील छत्रपती शिवाजी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मागील २ दिवसांपासून संततधार पडत असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे पडण्याचे प्रमाण दिसून आले आहे. तर, दुसरीकडे कळवा पूर्वेकडील डोंगर परिसरात वसलेल्या झोपडपट्टीमधील पांडे चाळीत राहणाऱ्या पाठक या कुटुंबीयांच्या घरावर सोमवारी सकाळच्या सुमारास वरच्या बाजूस असलेल्या घराची भिंत पडली. यामध्ये ऊर्मिला पाठक (५०), शिल्पा पाठक (१८) आणि सुरेश पाठक (१२) असे तीन जण यामध्ये जखमी झाले असून त्यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज रु ग्णालयात उपचार सुरू आहेत. याआधी महापालिकेनेही मुंब्रा, वागळे, कळवा या डोंगरपट्ट्यात राहणाऱ्या नागरिकांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. परंतु, असाच जर जोरदार पाऊस पडला, तर भविष्यात डोंगराळ भागात असणाऱ्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या लोकांचे जनजीवन विस्कळीत होऊ शकते. डोंगरावरची ही सर्व घरे भूमाफियांनी अनधिकृतरीत्या बनवल्यामुळे असे प्रकार घडत आहेत. भूमाफियांवर प्रशासनाचा अंकुश नाही, त्यामुळे तक्र ार करूनदेखील ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी कारवाई का करीत नाहीत, असा आरोप स्थानिक नगरसेवक महेश साळवी यांनी केला.