शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
3
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
4
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
5
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
6
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
7
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
8
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
9
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
10
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
11
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
12
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
13
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
14
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
15
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
16
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
17
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
18
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
19
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
20
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा

उत्साहावर पाणी फिरले, रेनकोट खरेदीची दिवाळीत आफत; शनिवार असूनही ठाणेकर राहिले घरातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 02:33 IST

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शनिवारी सायंकाळी दिवाळीच्या खरेदीवर पाणी फिरले. दुपारपासून सुुरू झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठाणेकरांनी खरेदीचा बेत रद्द केला किंवा ते रिकाम्या हाताने परतले.

ठाणे : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शनिवारी सायंकाळी दिवाळीच्या खरेदीवर पाणी फिरले. दुपारपासून सुुरू झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठाणेकरांनी खरेदीचा बेत रद्द केला किंवा ते रिकाम्या हाताने परतले. त्यामुळे ग्राहकांच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक दुकाने, शो-रूममध्ये सायंकाळी तुरळक ग्राहक दिसून आले.दिवाळीनिमित्त ठाण्याची बाजारपेठ फुलून गेली आहे. पणत्या, रंगीबेरंगी रांगोळ्या, कंदील, नवनवे कपडे, फराळ याने बाजारपेठ गेल्या १५ दिवसांपासून सजली आहे. छोटेछोटे विक्रेते लांबून रोजगारासाठी आले आहेत. गेल्या आठवड्याच्या अखेरीस खरेदीसाठी गर्दी बाहेर पडली होती. त्या वेळी रस्ते गर्दीने फुलून गेले होते. मात्र, अनेक शाळांमधील परीक्षा काल संपल्या. अनेक उद्योगांमधील कामगार, कर्मचाºयांचा बोनस अथवा सानुग्रह अनुदानाची रक्कम कालपरवाच त्यांच्या खात्यात जमा झाल्याने शनिवारी-रविवारी (उद्या) खरेदीसाठी गर्दी बाहेर पडेल, अशी विक्रेत्यांची अपेक्षा होती. त्यातच आज दुसरा शनिवार असल्याने शासकीय कार्यालयांसह अनेक खासगी आस्थापनांना सुटी होती. शनिवारी सकाळी चकचकीत ऊन पडले होते. मात्र, दुपारी २ वाजल्यानंतर अचानक आभाळात ढगांनी दाटी केली. ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली. यामुळे दुपारी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या ठाणेकरांची त्रेधातिरपीट उडाली. आपल्या वस्तूंचा पावसापासून बचाव करताना विक्रेत्यांचाही एकच गोंधळ उडाला. रस्त्यावरील अनेक विक्रेत्यांनी दुकानाच्या, बसस्टॉपच्या किंवा एखाद्या कोपºयात आडोशाला आसरा घेतला. एखादी सर येऊन गेल्यावर पाऊस थांबेल, अशी अपेक्षा होती. परंतु, बराच वेळ पाऊस कोसळत असल्याने अनेक विक्रेते आपला धंदा आवरून परत गेले.सायंकाळी उशिरा पावसाचा जोर कमी झाल्यावर काही ठाणेकर उशिरा खरेदीला बाहेर पडले. मात्र, त्यांची संख्या तुरळक होती. परिणामी, उद्या (रविवारी) सकाळी अनेक दुकानांत गर्दीची शक्यता आहे. रविवारी पुन्हा पाऊस नको रे बाबा, अशी प्रार्थना दुकानदार व फेरीवाले करत आहेत. दिवाळी खरेदीच्या उत्साहावर फिरल्या गेलेल्या या पाण्याचे पडसाद सोशल मीडियावर उमटले. दिवाळीकरिता रेनकोट खरेदी केला. आता पावसा किती पडायचे तेवढे पड, असे मेसेज व्हॉट्सअ‍ॅपवर फिरत होते.पावसामुळे हातावर हात ठेवूनच बसावे लागत आहे. आम्ही ग्राहकांची आतुरतेने वाट पाहत आहोत. शनिवारी जास्तीतजास्त ग्राहक येतील, अशी अपेक्षा होती, पण पावसामुळे ती फोल ठरली.- हरीश गाला, दुकानदार

टॅग्स :thaneठाणे